200, 500, 2000 पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होतात? काय आहे सत्य

नवीन नोटांवर पेनाने लिहिलेले असेल तर ती नोट चालणार का ते जाणून घेऊया…..?
100, 200, 500 च्या नवीन नोटांवर पेनाने लिहिले असेल तर ती नोट चालेल का …..? RBI ने काय सांगितले ते पाहूया…!!

BANKING NEWS-:

– गेल्या काही वर्षापासून भारतात पैशाची व्यवहार हे डिजिटल होत चाललेले आहे.

– आजकाल ऑनलाईन पेमेंटला विशेष महत्त्व दिले जाते. यासाठी UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

– बाजारात यूपीआय पेमेंटसाठी वेगवेगळे एप्लीकेशन सुद्धा उपलब्ध झालेले आहेत.

– गुगल पे ,फोन पे, आणि पेटीएम यांसारखे एप्लीकेशनद्वारे डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जात आहेत.

– तथापि भारतात असेही लोक आहेत की जे कॅशद्वारे पेमेंट केले जातात. काही लोक कंप्यूटर फ्रेंडली नसल्यामुळे त्यांना कॅशद्वारे पेमेंट करणे सुरक्षित वाटते तर काही लोकांना ऑनलाइन पेमेंटची रिस्क वाटते.

– सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे काही लोकांना ऑनलाइन पेमेंट करणे रिस्की वाटू लागले आहे.त्यामुळे आजही पैशाचा व्यवहार करताना कॅशद्वारे केला जात आहे.

– तुम्ही 100, 200 आणि 500 च्या नोटा व्यवहारात वापरल्यात असतील जर या नोटांवर काही लिहिलेले असेल तर ती नोट चालत का नाही ? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? कारण अनेक दुकानदार नोटांवर काही लिहिलेले असेल नोटांवर चिरडलेले असेल तर अशा नोटा घेण्यास ते नकार देत असतात.

– यांमुळे नोटांवर जर पेनाने काही लिहिलेले असेल तर या नोटा वापरण्यात येणार नाहीत का? हा मोठा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अशा नोटांसाठी आरबीआयने काय नियम केले आहेत ते आपण जाणून घेऊया👇🏻

  1. ◆ आरबीआय नोटांच्या नियमानुसार नोटांवर काही लिहू नये असा नियम रिझर्व बँक करते . यामुळे नोटांचे आयुष्य संपते परंतु नोटांची वैधता कमी होत नाही.
  2. ◆ चलनावर पेन वापरल्याने त्याचे आयुष्य कमी होते असे बँकेने म्हटले आहे.
  3. ◆ लोकांना क्लीन नोट पॉलिसीच्या माध्यमातून नोटांवर काही लिहू नये असे आवाहन करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही चलनाचे आयुष्य कमी करत आहात.
  4. ◆ एखाद्याने काही नोटांवर लिहिलेले असेल तर ती नोट वैद्य राहणार आहे म्हणजे चालणार आहे परंतु त्या नोटांचे आयुष्य कमी होते.
  5. ◆ भारताचे सुजन नागरिक म्हणून आपण कोणत्याच 100 200 500 नोटांवर पेनाने लिहिणे असे आरबीआयने आवाहन केले आहे.