Kolhapur Amba-Vishalgad Road News |सूर्यास्तानंतर आंबा ते विशालगड वाहतूक बंद राहणार आहे.

Kolhapur Amba-Vishalgad Road News
– सूर्यास्तानंतर आंबा ते विशालगड वाहतूक बंद राहणार आहे.

◆विशाळगड◆

● विशाळगडावरील रात्रीची वाहतूक प्राण्यांच्या संरक्षणासाठी बंद करण्यात आलेले आहे.

● विशाळगड मार्गावर पर्यटक भाविक प्रवासी रात्रीचा प्रवास करू शकत नाहीत.

● ज्यांना रात्रीचा प्रवास करायचा आहे त्यांनी अन्य मार्गाचा वापर करू शकता असे सांगितले आहे.

● हा मार्ग फक्त मोनाली, विशाळगड, गजापूर, केंभुणेवाडी आणि आंबा या गावांसाठी खुला राहणार आहे, अशी माहिती मलकापूर वनपरीक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी सांगितले आहे.

● सह्याद्रीच्या घनदाट जंगलामधून आंबा विशाळगड हा मार्ग जातो.

● राधानगरी आणि चांदोली या घनदाट अभयारण्यांना जोडणारा वनराजीचा भाग आहे.

● या जंगलामध्ये पशुपक्ष्यांचा वावर असतो कारण हे जंगल विविध पक्षी प्राणी आणि वनौषधी यांनी संपन्न असे जंगल आहे. दुर्मिळ अशा जैविक जाती ही इथे आढळतात.

● या जंगलामध्ये राज्य प्राणी शेकरू, गवा ,लांडगा ,कोल्हा, मोर, रानकोंबडे, मलबार पायबर पीठ, हॉर्नबिल यांसारखे दुर्मिळ पक्षी- प्राण्यांच्या जाती पहावयास मिळतात.

● या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तसेच नैसर्गिक संरक्षण राखण्यासाठी प्रमुख घटक म्हणून त्यांचे जतन व संरक्षणासाठी रात्रीचा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे.

● वनविभागाच्या वतीने प्रवाशांची तपासणी मोनाली येथील चेक पोस्ट येथे केली जाते.

● रात्रीची वाहतूक बंद केल्याने वनौषधीची तस्करी, चोरी , वृक्षतोड आणि गुन्हेगारी थांबवण्यास मदत होणार आहे.