◆Career Success Story◆ बँकर ,एमबीए ,बीटेक ते आयएएस पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करू शकता; IAS होऊन स्वप्न केले पूर्ण…..

◆Career Success Story◆
बँकर ,एमबीए ,बीटेक ते आयएएस पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करू शकता; IAS होऊन स्वप्न केले पूर्ण…..

तुम्ही आता तुमचे स्वप्न साकार करू शकता….

\:
प्रियवंदनाला वयाच्या पाचव्या वर्षापासून कलेक्टर व्हायचे स्वप्न होते. तिने आपण आयएएस अधिकारी होऊन करिअर करायचा असा निर्धारच केला होता. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने इन्व्हेस्टमेंट बँकरची मोठ्या पगाराची नोकरी सोडली होती.
तिने 2020 मध्ये यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली होती. या स्पर्धा परीक्षेत संपूर्ण भारतातून 13 वी रँक मिळवत आयएएस अधिकारी बनले आहे.

उच्च शिक्षणानंतर सहा वर्ष वित्तीय सेवा क्षेत्रातील नोकरी ते आयएएस अधिकारी होण्याचा तिचा प्रवास कसा होता ते पाहूया…..

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशी प्रियंका अशोक म्ह्णादळकर आहे. यूपीएससीने घेतलेल्या 2021 मध्ये परीक्षेत तेरावा क्रमांक मिळवून टॉपर बनली आहे. वयाच्या 31 व्या वर्षी तिने आयएएस अधिकारी बनली असून तिने परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलेले आहे.
तिने बी.टेक. मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेकनॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रिक इंजिनिअर पूर्ण केले आहे. नंतर तिने एमबीए आयआयएम बेंगलोर मधून केले आहे.
एमबीएनंतर तिला एका इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये नोकरी मिळाली तिने ती नोकरी सहा वर्षे वित्तीय क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये केली आहे.

प्रिय वंदनाला वडिलांकडून मिळालेली प्रेरणा :

प्रियवंदनाचे वडील महाराष्ट्र सरकारमध्ये कर्मचारी होते. तिला तिच्या वडिलांकडून नागरी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळाली. पण परिस्थिती आणि योगायोगामुळे इंजीनियरिंग आणि एमबीए केल्यामुळे अनेक वर्ष तिने कार्पोरेट क्षेत्रात काम केले.

◆प्रियवंदनाच्या गुणाची कामगिरी◆

यूपीएससी मेन्समध्ये प्रियवंदनाने समाजशास्त्र हा विषय पर्याय म्हणून ठेवला होता. तिला 2025 पैकी 1024 गुण मिळाले होते. तसेच तिला यूपीएससी 826 आणि मुलाखतीत 275 पैकी 198 गुण मिळाले होते. तिचे सर्वात महत्त्वाचे मत होत असे होते की, UPSC च्या तयारीसाठी योग्य अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे. तयार केलेल्या वेळपत्रकाचे ती नियमित पालन करायची. स्वतःच्या वैयक्तिक नोट्स बनवण्यात ही तिने जोर दिला होता याचा फायदा तिला असा व्हायचा की विषय समजून घेणे व लक्षात ठेवणे सोपे जाई. ती रोज 9 ते 10 तास अभ्यास करायची.

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रवास हा कठीण असतो, धीर धरावा लागतो….

प्रियवंदना स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांना असा संदेश देते की, तुम्ही अभ्यास केलेला विषय लिहिण्याचा सराव ठेवला की संकल्पना स्पष्ट होते. तसेच स्वतःच्या नोट्स असतील तर उजळणीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. मॉक टेस्ट सतत देत राहिल्याने उत्तरे चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.
तिने असा सल्ला दिला आहे की कोणतीही परीक्षा देताना स्वतःला सकारात्मक आणि प्रेरित ठेवले पाहिजे.