इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी FAME ll या योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय……|Good News For Electric Vehicle Buyers, The Government Has Taken A Big Decision

खुशखबर खुशखबर…..!!
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी FAME ll या योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय……|Good News For Electric Vehicle Buyers, The Government Has Taken A Big Decision

◆ इलेक्ट्रिक वाहना बाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

◆ इलेक्ट्रिक वाहने (FAME) योजनेच्या अंतर्गत अवजड उद्योग मंत्रालयाने दुसऱ्या टप्प्यासाठी आर्थिक आउटलेट 1,500 कोटी रुपयावरून 11,500 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.

◆ 2019 मध्ये FAME 2 ही योजना आणली होती, जी आत्तापर्यंत फक्त 10,000 कोटी रुपयांपर्यंत होती, नंतर ती वाढून 11,500 कोटी रुपये झाली.

◆ या योजनेचा फायदा थेट इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना होणार आहे. ही योजना 31 मार्च 2024 पर्यंतच लागू आहे.

◆ FAME 2 योजनेसह सरकारने दहा लाख इलेक्ट्रिक दुचाकी, पाच लाख इलेक्ट्रिक तीन चाकी आणि 55,000 इलेक्ट्रिक प्रवासी कार तसेच सात हजार प्रवासी बसेसना आर्थिक सहाय्य देण्याची योजना आखली आहे.

◆ या योजनेअंतर्गत 13.41 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना एकूण 5790 कोटी रुपयांची सबसिडी 31 जानेवारी पर्यंत देण्यात आली आहे.

◆ यामध्ये 11.86 लाख दुचाकी, 1.39 लाख तीन चाकी आणि 16,991 चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे.

◆ तसेच तेल कंपन्यांना 7,432 इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जिंग स्टेशनसाठी 800 कोटी रुपयाची भांडवली सबसिडी सरकारने मंजूर केली आहे.

◆ राज्य परिवहन उपक्रम, विविध शहरे आणि राज्य सरकारी संस्थांना इंटरसिटी वाहतुकीसाठी 6,862 इलेक्ट्रिक बसेससाठी मंजुरी दिलेली आहे.

◆ या नवीन योजने अंतर्गत, अनुदानासाठी 7,048 कोटी रुपयांची वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी दुचाकी वाहनांना 5,311 कोटी रुपये मिळाले आहेत. चार्जिंग स्टेशन आणि इलेक्ट्रिक बसेस बसवण्यासाठी एकूण अनुदान 4,048 कोटी रुपये करण्यात आले आहे.

FAME 2 मुदत कधीपर्यंत आहे ते जाणून घेऊया…..?

◆ 31 मार्च 2024 पर्यंत किंवा निधी शिल्लक असेपर्यंत FAME 2 सबसिडी मुदत मर्यादित योजना आहे.

◆ सरकारने पुढील आर्थिक योजनेसाठी FAME योजनेसाठी , गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात 2,671 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र फेम सबसिडी मुदत वाढवण्यादरम्यान सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केली नाही.

◆ मात्र ही रक्कम अर्थसंकल्पादरम्यान पुढील आर्थिक वर्षापर्यंत वाढवण्यात आल्याने सरकार फेम टू अनुदान योजना पुढे नेऊ शकते, असे सांगितले जात आहे.

◆ इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि विक्री देशात झपाट्याने वाढत असल्याने, यात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विभागात मोठ्या संख्येने मागणी आहे.

◆ 2022 मध्ये 1.02 मिलियन वरून 2023 मध्ये 1.53 मिलियन युनिट पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची एकूण विक्री होण्याच्या अपेक्षा आहे.

◆ सरकारने FAME 2 सबसिडीचा तिसरा टप्पा पुढे नेल्यास उद्योगाच्या वाढीस आणखी मदत होईल, हा विश्वास इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आहे.

◆ 31 मार्च 2024 रोजी FAME 2 ही योजना संपणार आहे.