kalakar-mandhan-yojana-maharashtra

कलाकार मानधन योजना 2024 अर्ज|kalakar-mandhan-yojana-maharashtra

साहित्य व कला या क्षेत्रात पूर्ण आपलं आयुष्य घालवणाऱ्या कलाकारांना म्हातारपणी आर्थिक बाबींमुळे हाल होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 यावर्षी मानधन योजना सुरू करण्यात आली.

कलाकार मानधन योजनेत सहभागी असणाऱ्या कलाकारांना वैद्यकीय उपचार व रोगासाठी एक रकमी पैशाची गरज असते परंतु तो आपला उदरनिर्वाह टिकून ठेवण्याच्या परिस्थितीमध्ये नसतो त्याचबरोबर आपल्या मुलांचं पालनपोषण करत असल्यामुळे कलाकारास त्याचा वैद्यकीय खर्च भागवण्यास असमर्थ असतो.

एखाद्या कलाकाराचा अपघातामध्ये जर त्याला अपंगतत्व आलं असेल तर त्याला त्यावेळी आर्थिक मदतीची गरज असते ” कलाकार मानधन योजना ” उपयोगाला येते. म्हणूनच ही योजना राबवण्याचा हा मुख्य हेतू आहे.

कोरोना काळात कलाकारांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे ते बघून माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जवळपास 56000 कलाकारांना आर्थिक मदत जाहीर केली.

KALAKAR MANDHAN YOJANA MAHARASHTRA.
2024 मध्ये मित्रांनो कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमुख अटी व शर्ती कागदपत्रे, लाभाचे स्वरूप आणि संपर्क साधण्याचे ठिकाण याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये सांगितलेली आहे

अटी व शर्ती (कलाकार मानधन योजना महाराष्ट्र)

1. वृद्ध साहित्यिक व कलावंत यांनी योजनेगत मानधन मिळण्यासाठी करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात जिल्हास्तरावर असणारे समाज कल्याण अधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषद अथवा तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे या संदर्भात चौकशी करावी.

2. प्राप्त अर्जावर जिल्हा परिषद मार्फत खालील निष्कर्षांच्या आधारे छाननी करण्यात येईल

निकष खालील प्रमाणे 👇

 • * साहित्य व कला या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप योगदान दिलेला आहे अशी व्यक्ती.
 • * कला व वाड्मय या क्षेत्रात जवळपास 15 ते 20 वर्ष आपले योगदान दिलेले आहे किंवा महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अशा व्यक्ती,
 • * ज्या कलाकारांचे यामध्ये स्त्री व पुरुष यांचे वय 50 वर्ष पेक्षा जास्त आहे. अशा व्यक्ती
 • * जे साहित्य व कलावंत ज्यांना कुष्ठरोग कर्करोग अर्धांग वायू क्षयरोग अशा रोगांनी ग्रस्त असतील तसेच ज्यांना 40% पेक्षा जास्त शारीरिक व्यंग्य असेल
 • किंवा अपघाताने 40% पेक्षा जास्त अपंगतत्व आले असेल आणि त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत अशा साहित्यिक व कलावंतांसाठी वयाची मर्यादा वगळण्यात आली आहे.
 • * जे साहित्यिक व कलावंत हे वयाने वडील असणाऱ्या व विधवा तसेच वृद्ध व्यक्ती यांना मानधन देण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
 • * ज्या साहित्यिक व कलावंतांचे वार्षिक उत्पन्न हे 48000/- पेक्षा जास्त नाही असे कलावंत
 • * छाननी करून अंतिम टप्प्यात योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणारे अर्ज जिल्हास्तरीय निवड समितीच्या मंजुरीने सादर करण्यात येतील.
 • * जिल्हास्तरीय निवड समिती पात्र अर्जातून प्रत्येक वर्षाला इष्टकांच्या साठ लाभार्थ्यांची मांजरासाठी निवड करू शकत. निवड झालेल्या लाभार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे मानधन अदा करण्यात येईल.
 • * निवड करण्यात आलेल्या साहित्यिक कलावंतांना शासन निर्णय क्र. वृकमा 2013/ प्र.क्र. 40/सां. का. 4दिनांक 2282014 अन्वये सुधारित दराने

 

पाहिजे असलेले कागदपत्र खालील प्रमाणे 👇

 1. * साहित्य कलाक्षेत्रातील पुरावे (सन 2010 च्या आतील कलेचे पुरावे )
 2. * आधार कार्ड
 3. * राशन कार्ड झेरॉक्स
 4. * वयाचा दाखला
 5. * बँक पासबुक
 6. * उत्पन्नाचा दाखला
 7. * पती-पत्नीचा फोटो जर पत्नी नसेल तर स्वतःचा फोटो
 8. * शिफारस पत्र
 9. * स्टॅम्प पेपर वर सरकारी लाभ मिळत नसल्याचे नोटीस
 10. * वय किमान 50 वर्ष
 11. * सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी तीन झेरॉक्स सत्यप्रत केलेले.

 

 1. * मानधन *
 • अ वर्ग -2100rs प्रति महिना
 • ब वर्ग -1800rs प्रति महिना
 • क वर्ग -1200rs प्रति महिना

Kalakar Mandhan Yojana Form PDF Download 👇

समाज कल्याण अधिकारी/ गट विकास अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

 

महाराष्ट्र योजना.