XUV300 आणि XUV400 EV मॉडेलवर फेब्रुवारी माहिन्यात मोठी सूट देण्यात येणार आहे तर, महिंद्रा कंपनी कोणत्या मॉडेलवर किती सूट देते ते जाणून घेऊया.

XUV300 आणि XUV400 EV मॉडेलवर फेब्रुवारी माहिन्यात मोठी सूट देण्यात येणार आहे तर, महिंद्रा कंपनी कोणत्या मॉडेलवर किती सूट देते ते जाणून घेऊया.

ही ट्रिक वापरा👇🏻एक लाखपर्यंत डिस्काउंट प्रीमियम गाड्यांवर कसा मिळवायचा….?🤔

मुंबई :

  • ◆ फेब्रुवारी 2024 मध्ये महिंद्रा ऑटोमोटिव्हन यांनी ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे.
  • कंपनीने एक लाख रुपयांपर्यंत बोलरोवर बंपर सूट दिली आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत, कार्पोरेट सवलत आदींचा समावेश होतो.
  • ◆ महिंद्रा कंपनी फेब्रुवारी माहीन्यात 73 हजार रुपयांपर्यंत त्यांच्या निवडक मॉडेलवर डिस्काउंट देत आहे.
  • ◆ महिंद्रा कंपनीने 2023 मधील बोलेरो निओ, बोलेरो, आणि मराझो या मॉडेलवर चांगली ऑफर दिली आहे.तसेच 2024 मधील एमपीव्ही आणि एसयूव्ही मॉडेलवर सुद्धा मोठी सूट दिली आहे.
  • ◆ याशिवाय XUV300 आणि XUV400 EV या मॉडेलवर मोठी सूट देण्यात येत आहे, चला तर मग जाऊन घेऊया कोणत्या मॉडेलवर किती सूट आहे.

मराझो गाडीवर किती सूट मिळेल…?
मराझो एमपीव्ही- M2, M4 + M6+ या तिन्ही व्हेरियंटमधील 2023 च्या मॉडेलवर एकूण 93 हजार 200 रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. तर, मराझो मॉडेलवर फक्त 2024 मध्ये 200 रुपये कमी दरात ऑफर केली जात आहे.

महेंद्रा बोलेरोवर किती सूट मिळेल…?

  1. ◆ महिंद्रा बोलेरो 2023 मध्ये तयार करण्यात आलेल्या एसयूव्ही टॉप-टियर B6 (O) वर तब्बल 98 हजार रुपयांपर्यंत कंपनीकडून सूट देण्यात येत आहे.
  2. ◆ B4 आणि B6 व्हेरियंटवर 75 व 73 हजार रुपयांपर्यंत फेब्रुवारी माहिन्यात सूट देण्यात येत आहे, तर B4,B6 आणि B6(O) मॉडेलवर 2024 मधील अनुक्रमे 61 हजार, 48 हजार, व 82 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
  3. ◆ एन्ट्री-लेव्हल बोलेरो B2 वर फेब्रुवारी 2024 मध्ये कोणतीही ऑफर दिली गेली नाही.

महिंद्रा बोलेरो निओवर किती मिळेल सूट…?

बोलेरो निओ मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फेब्रुवारी 2024 मध्ये 2023 मधील रोख सवलत, एक्सचेंज बेनिफिट्स, कार्पोरेट सवलत, ॲक्सेसरीज आणि वॉरंटी असे फायदे मिळणार आहेत.

दरम्यान, बोलेरोची क्रेझ वाढत चालली आहे. भारतीय बाजारपेठेत आजही या गाडीला खूप पसंती आहे. शहारासोबत ग्रामीण भागातील ग्राहकांची पसंती असल्यामुळे फेब्रुवारी माहिन्यात मोठी सूट मिळत असल्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो.