Lekha koshagar Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे येथे रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील. सरकारी विभागात स्थिर नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
भरतीचे तपशील:
- भरती विभाग: लेखा व कोषागारे विभाग
- भरती प्रकार: लेखा व कोषागारे विभागांतर्गत पदांसाठी
- भरती श्रेणी: राज्य सरकार (महाराष्ट्र शासन)
- पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल (गट-क)
- भरती कालावधी: कायमस्वरूपी नोकरी
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक.
- मराठी टायपिंग 30 WPM किंवा इंग्रजी टायपिंग 40 WPM गतीचे सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
मासिक वेतन: ₹29,200 ते ₹92,300.
एकूण रिक्त पदे: 131.
वयोमर्यादा: 19 ते 43 वर्षे.
नोकरीचे ठिकाण:
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर येथील कार्यालयांमध्ये नियुक्ती होईल.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जासाठी लिंक खालीलप्रमाणे उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
30 जानेवारी 2024
महत्त्वाची सूचना:
भरतीसंबंधित सर्व तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच अर्ज करताना सर्व पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये.