zomato share price
शेअर करा.

आजच्या घडीला पुण्या-मुंबईसारख्या शहरांत असं कुणी अभावानेच पाहायला मिळेल की ज्याने झोमॅटोवरून काही ऑर्डर केलं नसेल!

लॉकडाऊनच्या काळात तर बऱ्याच जणांची भूक झोमॅटोने भागवली असेल.

झोमॅटो ही ऑनलाईन फूड डिलीवरी करणारी एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी त्या त्या भागातल्या हॉटेल्सशी संलग्न असते.

zomato food
Image source: IndiaDesire

भारतात सध्याच्या घडीला ऑनलाईन फूड डिलीवरी करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. स्विगी, उबर इट्स आणि झोमॅटो या त्या व्यवसायातील आघाडीच्या कंपन्या आहेत.

हे पण वाचा:

पुण्याची कंपनी आणि गुंतवणूकदार झाले मालामाल

मराठ्यांच्या अटकेपार झेंड्याच्या म्हणीची कहाणी

महिंद्राची नवीन बोलेरो येतेय.जाणून घ्या काय आहेत फीचर्स.

नेटकऱ्याने विचारले नीरजला ही गाडी देणार का? आनंद महिंद्रा म्हणाले..

सध्या झोमॅटो चर्चेत आहे कारण काही दिवसांपूर्वीच झोमॅटोचा शेअर भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाला होता. २३ जुलैला त्याची भारतीय शेअर बाजारात एक धमाकेदार एंट्री झाली होती.

त्याने आपल्या फायनल ऑफर प्राइसच्या जी की होती ७६ रु, तीच्या ५२.६३ % नी उसळी घेऊन बाजारात आपली शानदार एंट्री केली होती.

त्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर तो शेअर १२५.८५ रुपयांवर म्हणजे ६५.५९ टक्क्यांनी वरती बंद झाला.

२००८ साली दिपिंदर गोयल, पंकज चढ्ढा आणि गुंजन पाटीदार यांनी सुरू केलेल्या झोमॅटो या स्टार्टअप मध्ये इन्फो एज ची १८.६%, उबर ची ९.१%, अॅिलपे सिंगापूर ची ८.३% तर अँटफिन सिंगापूर ची ८.२% गुंतवणूक होती.

आपल्यासोबत भागीदारीत असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांची माहिती, त्यांचे पदार्थ आणि ग्राहकांचे अभिप्राय अशा बऱ्याच गोष्टी ते आपल्या ग्राहकांना देऊ करत असतात. सध्या भारताच्या बाहेरही झोमॅटोने आपले जाळे विस्तारले आहे.

नुकताच कंपनीने त्यांच्या पहिल्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला असून त्यात त्यांना मागच्या वर्षीच्या तुलनेत रुपये ३५६ कोटींचा तोटा झालेला आहे.

बाजारातील जाणकारांच्या मते जरी ही कंपनी सध्या तोटा दर्शवत असली तरी भारतातील भविष्यातील ऑनलाईन फूड व्यवसायातील संधी लक्षात घेता ही कंपनी भविष्यात नक्कीच फायद्यात येईल आणि आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल.

आजच्या दिवशी NSE वर झोमॅटो १३३.८५ रुपयांवर खुला होऊन १३७.३५ रुपायांवरती बंद झाला.

टीप: वर दिलेली झोमॅटोच्या शेअरच्या बद्दलची माहिती हा कोणताही गुंतवणूक सल्ला नसून ही माहिती केवळ माहिती देण्याच्या हेतूने पुरवली आहे. तज्ञांचा सल्ला घेऊनच आपण यामध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *