रणबीर कपूरच्या वाढदिवशीच यशराज फिल्म्सने एक पोस्टर प्रदर्शित करून रणबीरच्या चाहत्यांना दिला सुखद धक्का.
दाखवली शमशेराची पहिली झलक.
बॉलीवूडच्या बड्या बॅनरपैकी एक असलेल्या यशराज फिल्म काहीतरी तागडे चित्रपट बनवण्यात माहीर आहे. आधी अमिताभ बच्चन, नंतर शाहरुख खान, सलमान खान अशा तगडया अभिनेत्यांना घेऊन खूप हिट चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले.

त्यात त्यांनी अनुष्का शर्मा, रणविर सिंग असे काही नवे चेहरेही त्यांनी लॉंच केले.
अशा या यशराज फिल्म्सचा बहुचर्चित असा चित्रपट त्यांनी रणबीर कपूरसोबत जाहीर केला होता. मधल्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र यांच्याकडून त्या चित्रपटावर फार काही त्यांच्याकडून जाहीर केले गेले नव्हते. मात्र चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या.
हे पण वाचा:
MG Astorचे ऑक्टोबरमध्ये लॉन्चिंग? पहा खासियत
सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची पोहचली इंग्लंडला
सत्तर रुपये वारून झाली ३३ वर्षे
आज मात्र यशराज कडून रणबीर कपूरच्या वाढदिवशी त्याच्या शमशेरा या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. त्यांच्या या प्रदर्शनामुळे रणबीरच्या चाहत्यांना त्यांनी एक सुखद धक्काच दिला आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
स्टारकास्ट असणार तगडी:
यशराजने या चित्रपटासाठी तगडी स्टारकास्ट निवडली आहे. अभिनेता रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असून सोबत वाणी कपूरची हिरोईन म्हणून वर्णी लागली आहे. अभिनेता संजय दत्त याचीही या चित्रपटात खास भूमिका असणार असून आदित्य चोप्रा हा या चित्रपटाचा निर्माता असणार आहे व हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची जबाबदारी करण मल्होत्रावर असणार आहे.

विशेष म्हणजेत्याची शेवटची फिल्म संजू ही ज्या अभिनेत्याच्या संजय दत्तच्या जीवनावर बेतली होती त्याच्यासोबत शमशेरा या चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी त्याला मिळणार आहे.
शिवाय वाणी कापूरही २०१९ सालच्या यशराज फिल्म्सच्या वॉर या चित्रपटात अभिनेता ह्रीतिक रोशनसोबत झळकली होती आणि आता ती त्याच बॅनरखाली रणबीर कपूरसोबत झळकणार आहे.
कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
यशराज फिल्म्सचा खूप महत्वाकांक्षी चित्रपट असणारा शमशेरा हा चित्रपट साधारणपणे १८ मार्च २०२२ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल असे बॅनरकडून सांगण्यात आले असून आगामी काही दिवसांत त्याचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित होईल.
tags:
shamshera movie poster, shamshera movie teaser, shamshera trailer,shamshera movie trailer, shamshera starcast, shamshera release date, shamshera movie, bollywood news, bollywood latest updates, bollywood updates, marathi news, latest updates in marathi