हल्ली सतत बातम्या येत असतात की, अमुक अमुक कंपनीने आपला आयपीओ IPO आणला आणि आयपीओ येताच त्यावर गुंतवणूकदार तुटून पडले.
साधारण महिन्या पंधरा दिवसाला आपल्याला याबाबत ऐकायला मिळत असते किंवा वाचायला तर मिळत असते.
तर जाणून घेऊया थोडंसं कंपनीच्या IPO बद्दल.

IPO म्हणजे काय?
एखादी कंपनी जेव्हा सार्वजनिक होण्याचे ठरवते तेव्हा लोकांकडून पैसे उचलण्याच्या किंवा गोळा करण्याच्या हेतूने ती कंपनी त्या लोकांना पैशाच्या बदल्यात आपले शेअर्स देऊ करते; पण हे वाटतं तितकं सोप्पं नसतं.
बाकीकडून पैसे गोळा करणे टाळून जेव्हा कंपनी शेअर बाजारातून पैसे उचलण्याच्या हेतूने येते तेव्हा तिला आपला आयपीओ सादर करावा लागतो. हे त्या कंपनीच्या बाबतीत लागू असते जी कंपनी अजून बाजारात लिस्ट झालेली नाही.
IPO- Initial Public Offering
एखादी कंपनी का आणते IPO?
एखादी कंपनी आपला IPO आणते ते या मुख्य कारणासाठी आणि ते म्हणजे बाजारातून पैसा उभा करण्यासाठी.
पण मग कंपनीला पैसा उभा करायला दुसरे मार्ग नसतात का? तर असत ना आणि ते म्हणजे, बँकेकडून पैसे उचलणे, परदेशातून पैसा उभा करणे, देशातील मोठ-मोठ्या लोकांकडून किंवा संस्थांकडून पैसा उभा करणे असे बरेच मार्ग असतात.

हे पण वाचा:
पुण्याची कंपनी आणि गुंतवणूकदार झाले मालामाल
झोमॅटो वरून नुसतं जेवण ऑर्डर करता की झोमॅटोचे शेअर्स पण घेता?
ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती
MG Astorचे ऑक्टोबरमध्ये लॉन्चिंग? पहा खासियत
साधारणपणे बऱ्याच कंपन्यांकडे हे कारण असतं आपला आयपीओ आणायचे आणि ते म्हणजे आपल्या कंपनीचा विस्तार करणे किंवा एखाद्या चालू प्रोजेक्टला पैसा पुरवणे.
याखेरीज देखील काही करणे असू शकतात आणि ती म्हणजे, कंपनीला आपलं कर्ज चूकतं करायचं असतं किंवा किंवा कंपनीच्या पहिल्यापासून भागीदार असलेल्या अशा प्रमोटर लोकांना निरोप देणं असू शकतं.
IPO आणण्याचा क्रम कसा असतो?
सेबी ने घालून दिलेल्या नियमांवलीचे काटेकोर पालन करत कंपनी आपला आयपीओ IPO बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करते. त्याचा क्रम असा असतो,
कंपनीच्या ipo च्या क्षमतेनुसार कंपनी एका किंवा अनेक मर्चंट बँकरची नेमणूक करते.
नंतर कंपनीची माहिती, तिची सार्वजनिक जाण्याची कारणे हे एका रजिस्ट्रेशन स्टेटमेंट द्वारे सेबीला पुरवले जाते.
सेबी त्याची पडताळणी किंवा छाननीकरते व अजून काही पूर्तता हव्या असल्यास ती त्या कंपनीकडून मागवते.
त्यानंतर एक DRHP सादर करून मग आयपीओ प्रोमोशन होते, प्राइस बॅंन्ड ठरतो आणि त्यानंतर आयपीओ खुला होतो.
सध्या बाजारात आयपीओ ची खूप रेलचेल पहायला मिळते आहे. काही आयपीओ आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा देत असून बाजारात नव्याने येणाऱ्या लोकांना असे आयपीओ आकर्षित करत राहतात.
क ब , म न क ,म न ड स , य ज ,भ रत ,हन म न ड ,अन य ,ग क ,ख बस रत ,स घ र क ल ए य र ह द