virat kohli source: twitter
शेअर करा.

सेहवागने (Virender Sehwag) १३ ऑगस्टला केलं होतं हे ट्विट

भारताचा माजी सलामीवीर आणि जो आपल्या विस्फोटक खेळीने भल्या भल्या गोलंदाजांची अक्षरशः झोप उडवायचा असा आपला विरुपाजी!

आधी तो मैदानात आपल्या बॅटने फटके मारायचा आता तो ट्वीटर वरून शब्दानेच एखाद्याला फटके मारण्याचे काम करतो.

तसा तो अगदी स्पष्ट बोलण्यात माहिर आहे असं म्हणावं लागेल; पण त्याची बोलण्याची आपली अशी एक खास शैली आहे.

त्याचं असं झालं की ऑगस्टच्या १३ तारखेला एक ट्विट शेअर करत त्यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (captain Virat Kohli) उल्लेख केला होता.

त्याने शेअर केलेलं ट्विट साधारण असं होतं.

त्याने शेअर केलेलं ट्विट असं होतं की, दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या ९९.९९% आणि ९९.९७% गुणांवर असमाधानी असल्यामुळे पुन्हा परीक्षा देणार असं काहीसं होतं.

त्याचाच धागा पकडून सेहवागने ते ट्विट शेअर करत पुढे लिहिलं की आपले शतक करण्यासाठी एवढ्या वाईटपणे तर कोहली पण तडपत नसेल.

कोहली (kohli) ने आपलं शेवटचं शतक कधी ठोकलं होतं?

पोर्ट ऑफ स्पेन (port of spain)ला खेळताना कोहलीने आपलं शेवटचं एकदिवसीय (one day international) शतक ठोकलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्याला पुन्हा शतक थोकण्यात मात्र सतत अपयश आलं आहे.

हे पण वाचा:

शासनाचा आदेश झुगारून आमदार गोपीचंद पडळकर करणार छकडा गाडी शर्यतींचं आयोजन

झोमॅटो वरून नुसतं जेवण ऑर्डर करता की झोमॅटोचे शेअर्स पण घेता?

मराठ्यांच्या अटकेपार झेंड्याच्या म्हणीची कहाणी

मागच्या वर्षी म्हणजेच २०२० साली त्याच्या बॅटमधून एकही शतक निघालं नाही.

सध्या त्याच्या याच गोष्टीमुळे त्याचे फॅन्सही चिंतेत आहेत.

आपण आशा करू की त्याच्या शतकाचा दुष्काळ लवकरात लवकर संपो अशीच आपण प्रार्थना करुयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *