Udayanraje Bhosale
शेअर करा.

उदयनराजे छत्रपतींबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का? Information about Chatrapati Udayanraje

छत्रपती शिवाजी महाराजां Chatrapati Shivaji Maharaj चे थेट तेरावे वंशज आणि सातारा गादीचे वारसदार असलेले उदयनराजे संबंध महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात माहिती आहेत.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale, credits:Internet

आपल्या हटके स्टाईलमुळे त्यांची खासकरून तरूणांवर एक वेगळीच छाप आहे. एक खुशमिजास, तेवढंच करारी आणि मनाने खूपच दिलदार व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. शिवाय त्यांचा कधी कधी हळवा वाटणारा, आपल्या लोकांप्रती कधी कधी डोळ्यांत अश्रू आणणारे राजे म्हणून बराच मोठा चाहतावर्ग त्यांचा आहे.

या सर्व गोष्टी महाइन्फो आपल्याला का सांगत आहे? त्या तर सर्वांना परिचयाच्या आहेतच!

तर आज आम्ही खास तुमच्यासाठी उदयनराजेंबद्दलच्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा काही गोष्टी घेऊन आलो आहोत.

मराठी चित्रपटात अभिनय:

उदयनराजे यांचं चित्रपटांबद्दलचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे. मग तो चित्रपट हिंदी असू द्या, मराठी असू द्या किंवा तो चित्रपट अगदी साऊथचा असू द्या.

तर ही गोष्ट आहे सन २००० सालची. त्यावेळच्या मराठी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका देखील केली आहे.

त्या मराठी चित्रपटाचं नव आहे- सर्जा राजा.

त्यावेळी प्रदर्शित झालेल्या सर्जा राजा या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. udayanraje played a cameo in marathi movie sarja raja.

एका गावच्या शर्यतीच्या बक्षीस वितरण समारंभात ते विजेत्याला बक्षीस देतानाचे भाषण सांगतानाचा तो एक प्रसंग होता.

त्यानंतरच्या काळात मात्र त्यांनी अशी काही भूमिका कुठे केलेली दिसत नाही.

डायलॉग:

एखाद्या चित्रपटाचा एखादा डायलॉग फेमस झाला की तो त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतोच.

कधी कधी असं सुद्धा झालेलं आहे की चित्रपटाचे माहीत नसलेले डायलॉग म्हणून त्यांनी ते फेमस केले आहेत.

डिसेंबर २१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा pushpa movie चित्रपटातील डायलॉग, सलमानच्या चित्रपटांतील डायलॉग असे बरेच ते मारत असतात.

त्यामुळे लोकांना त्यांचा असा स्वभाव आवडतो.

‘परत सांगितलं नाय म्हणूण सांगायचं नाय,’ ‘स्टाईल ईज स्टाईल,’ असे काही त्यांचे डायलॉग आणि तेही आपल्या एक वेगळ्या स्टाईलने म्हणायची त्यांची पद्धत व त्यात भर म्हणून त्याची ती सातारी रांगडी भाषा यांमुळे ते राजघराण्यातील असून देखील लोकांना आपल्यातीलच एक वाटून जातात.

007:

बऱ्याच जणांना हे कदाचित पटणार नाही पण उदयनराजे हे जेम्स बॉन्ड आणि बॉन्डपटांचे निस्सीम चाहते आहेत. शिवाय त्यांच्या गाड्यांचे नंबरदेखील ००७ असे आहेत.

त्यांचे गाड्यांचे कलेक्शन देखील चांगले आहे.

त्यांच्या ताफ्यात ऑडी, पजेरो, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, टाटा, महिंद्रा थार अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे.

शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर गाडी विकत घेतली तर ते देखील त्यांच्या जलमंदिर पॅलेस इथे राजेंकरवी नारळ फोडण्यासाठी घेऊन येतात. तेव्हा राजे देखील ड्राईव करण्याचा मोह आवरू शकत नाहीत.   

परदेशात शिक्षण:

महाराष्ट्रातल्या नाशिक येथे जन्म घेतलेले उदयनराजे यांनी पुण्यात आपलं इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन आपलं एमबीए पूर्ण केलं आहे.

लंडनला त्यांनी आपला एमबीएचा कोर्स पूर्ण केला आहे.

एकंदरीत ते उच्चविद्याविभूषित आहेत.

जनतेशी असलेलं नातं:

कधी कधी सामान्य जनतेत मिसळल्याचे त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ येत असतात.

अगदी वृद्ध बायका-माणसांच्या सोबत अगदी साधेपणा दाखवत ते बसलेले असतात. त्यांच्याशी ते आपुलकीने आणि प्रेमाने बोलत व विचारपूस देखील करत असतात.

सामान्य आणि तळागाळातल्या लोकांची त्यांचे चांगले जमते. त्यामुळे ते लोकांना देखील आपलेसे वाटत असतात.

एवढेच नव्हे तर सामन्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न देखील ते जाणून घेतात. शिवाय एखाद्याचा त्रास पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू देखील उभे राहतात.

हे पण वाचा:

हे पण वाचा:

रितेश आणि जिनीलिया यांनी आणले शाकाहारी मटन

A trillion dollar mistake Yahoo made याहूच्या ट्रीलियन डॉलरच्या चुका तुम्हाला ठाऊक

सत्तरच्या दशकात या मॉडेलने जुहू बीचवर नग्न धावून खळबळ माजवली होती.

वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली होती ट्रोल, दिले सडेतोड उत्तर

मधल्या काळात त्यांच्यावर राजकीय स्थित्यंतरे करण्याची वेळ आली आणि त्यांनी आपले राष्ट्रवादीशी असलेले राजकीय संबंध सोडून भाजपशी संधान साधले.

मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

कॉलर उडवणे, मुलाखतीत बोट दाखवणे आणि अशा बऱ्याच वेगळेपणाने भरलेल्या अशा व्यक्तिमत्वाचा  राजकीय पराभव होऊ शकतो मात्र त्यांनी लोकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे ही मात्र तितकंच खरं आहे.

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज असल्या कारणाने कदाचित असेल पण जनसमान्यांच्यात ते एक राजे म्हणूनच नजरेत राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *