मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

सततच्या पावसामुळे अचानक दरड कोसळून झालेल्या अपघातात रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील ३३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी त्वरित तिथला दौरा करून तेथील मृतांच्या नतेवाईकांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना त्यातून सावरण्यासाठी चार धीराचे शब्द सांगितले.
तिथून मग ते आपल्या पुढील दौऱ्यास निघून गेले.
सर्वांचे योग्य पुनर्वसन केले जाईल व योग्य ती मदतही सर्वांना दिली जाईल या शब्दांत त्यांनी ग्रामस्थांना आश्वास्थ केले.
त्यावेळी सोबत मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अदिती तटकरेही उपस्थित होते.

गेल्या आठवड्यापासून पावसाने कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. जवळपास २०१९ च्या पुरासारखी परिस्थिति आत्ता सुद्धा झाली आहे. पुणे-बंगळूर हायवे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
शिवाय महाड, चिपळूण अशा शहरांचाही संपर्क तुटला आहे. शिवाय तेथील राज्यमार्गही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. म्हणून मदत पोहचवताना अडचणी येत आहेत. तरीही काही नागरिक, सामाजिक संस्था, सरकारी यंत्रणा जमेल तेवढी मदत पुरवताना दिसत आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढून सुखरूप स्थळी त्यांचे स्थलांतर करण्याची कामे होत आहेत.

सन २०१९ साली आलेल्या सांगली-कोल्हापूर पुरातही अत्यंत नुकसान झाले होते. याही वर्षी संभाव्य पुराची सूचना लक्षात घेता, काही भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे.
नागरिकांची शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाईची मदत मिळावी आणि ती त्वरित मिळावी ही अपेक्षा आहे. जिथे जिथे बचवकार्यात अडथळे येत आहेत तिथे NDRF च्या मदतीची मागणी केली जात आहे.
तसेच सध्या पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे तर बचावकार्य अजून वेगात होईल व ठिकठिकानचं पुराचं पाणी ओसारण्यास सुरवात होत आहे तर तेथील नागरिकांनाही थोडा दिलासा मिळेल अशी सरकारची अपेक्षा आहे.
हे ही वाचा.
टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतानं खातं उघडलं.!
चीनची कियान यांग टोकियो ऑलिंपिकची पहिली सुवर्णपदक विजेती!
टोकियो ऑलिम्पिकचं दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन.!
सलमान ने ट्विट केला जीम वर्कआउटचा व्हिडिओ
Pegasus बद्दल तुम्हाला माहीत आहे का?
[…] तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त… […]