olympic opening ceremony
शेअर करा.

Tokyo Olympic Opening Ceremony-टोकियो ऑलिम्पिकचं दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन.!
आज दि. २३ जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकचं दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन पार पडलं. भारतातर्फे महिला बॉक्सर मेरी कोम व हॉकी पट्टू मनप्रीत सिंग यांनी ध्वजावाहन केले.

२३ जुलै ते ८ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असून जपानच्या टोकियो शहरात या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. अधिकृतपणे जरी या स्पर्धेचं नाव दि गेम्स ऑफ XXXII ऑलिम्पियाड असलं तरी तिचं टोकियो ऑलिम्पिक २०२० असं ब्रँडिंग केलं गेलं आहे.
 

या स्पर्धेत जवळपास २०६ देशांचे साधारण ११,२३८ हुन जास्त खेळाडू सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

picture credits: outlookindia.com

या स्पर्धेचा मोटो काय आहे माहीत आहे का?

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा मोटो आहे- United by Emotion


या ऑलिम्पिकची एक खास गंमत तुम्हाला माहीत आहे का?

ती खास गंमत म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात सहभागी असलेल्या महिलांचा टक्का यंदा जास्त आहे. यंदाचा टक्का एकूण सहभागांपैकी ४९ टक्के इतका असून तोच टक्का २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकला ४६ इतका होता.


भारत आणि टोकियो ऑलिम्पिक २०२०.

भारतातर्फे या ऑलिम्पिकसाठी १८ प्रकारच्या खेळांमध्ये १२० स्पर्धक भाग घेतील. गेल्या ऑलिम्पिक मध्ये भारताला एक ब्रॉन्झ व एक रौप्य अश्या दोनच पदकांवर समाधान मानावं लागलं होतं; पण आपण यावेळी आपल्या खेळाडूंकडून नक्कीच चांगली अपेक्षा ठेवू शकतो.!

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या खेळाडूंच्या संचलनाचा दुरदर्शनचा व्हिडिओ ट्विट करून भारतीय चमुंना आत्मविश्वास दिला आहे!

गेल्या वर्षी होणारी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या कारणाने या वर्षीच्या जुलैला घ्यायचं ठरलं. कोरोनाच्या सावटाखाली शेवटी ही स्पर्धा पार पाडावी लागणार आहे. प्रत्येक ऑलिम्पिकला उपस्थित असणारे प्रेक्षक या ऑलिम्पिकला उपस्थितीत नसतील.

मागील आठवड्यात जेव्हा ऑलिम्पिक आठवड्यांवरती येऊन ठेपली असताना टोकियो मधील कोरोनाच्या वाढत्या केसेस हा एक चिंतेचा विषय बनला होता.

त्यात अजून काही बड्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माघार ही काही लोकांच्या नाराजीचं कारण बनली आहे.

असो.. ऑलिम्पिकमध्ये सहभागी स्पर्धकांना महाइन्फो कडून शुभेच्छा!

यंदा भारताला घसघशीत पदके मिळो ही अपेक्षा!

2 thoughts on “टोकियो ऑलिम्पिकचं दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन.!”
  1. […] भारतातर्फे ऑलिंपिक मध्ये पदकांचं खातं उघडलं गेलं आहे. स्पर्धेच्या अगदी सुरवातीलाच भारताने आपलं स्पर्धेतील पहिलं वाहिलं रौप्य पदक मिळवलं आहे. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *