io users to get unstricted access to disney+hotstar content with new plans.
शेअर करा.

jio users to get unstricted access to disney+hotstar content with new plans.

जिओ हा भारतातील सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर (telecom operator- दूरसंचार सेवा पुरवठादार) आहे.

मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (RIL- Reliance Industries Limited) तो एक मोठा भागही आहे.

भारताच्या या आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादार असलेल्या जिओ (jio) ने नुकतंच आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी (prepaid customers) नवे प्लॅन्स (new plans) जाहीर केले आहेत. जिओच्या नव्या प्लॅन्सच्या मध्ये त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी पूरक असे Disney+hotstar च्या संपूर्ण कॉन्टेन्टचे सब्स्क्रिप्शन पण देऊ केले आहे.

io users to get unstricted access to disney+hotstar content with new plans.
image source:the financial express io users to get unstricted access to disney+hotstar content with new plans.

जिओ च्या अमर्यादित फ्री कॉल (free calls), डेटा (data),आणि एसएमएस (sms) आणि बाकी सुविधांसोबत जिओने Disney+hotstar चे व्हीआयपी सब्स्क्रिप्शन (vip subscription) पण देऊ केले आहे.

हे पण वाचा:

४ तारखेची राज्यसेवा आयोगाची परीक्षा देताय मग या पाच गोष्टी करा

सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच

आणि तो फोटो आजही जपानी लोक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात

5 Highly Recommended English Practice Apps तुमचं इंग्लिश सुधरविण्यासाठी

जिओ ने म्हटले आहे की आपल्या ग्राहकांना ते Disney+hotstar चे सर्व फायदे तर देणारच आहेत पण त्याचसोबत त्याच्या सब्स्क्रिप्शन सोबत ते आपल्या ग्राहकांना आंतराष्ट्रीय कॉन्टेन्टची पूर्ण लायब्ररी इंग्रजी भाषेतून उपलब्ध करणार आहे ज्यात Disney+ओरिजनल्स, Disney चे टीव्ही शोज , marvel, स्टार वॉर्स- star wars , नॅशनल जिओग्राफिक्स- national geographics , HBO, FX अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असेल.

सध्या ज्यांच्याकडे आपल्या चालू प्लॅन मध्ये Disney+hotstar VIP- व्हीआयपी चे सब्स्क्रिप्शन त्यांना live sports, हॉटस्टार स्पेशयल्स-hotstar specials, ब्लॉकबस्टर चित्रपट- blockbuster movies आणि टीव्ही शो- TV shows हे ३ भारतीय भाषेतून उपलब्ध करून मिळणार आहेत.

असे असतील नवीन प्लॅन्स:

२८ दिवसांच्या प्लॅन ची किंमत ४९९/- रुपये असेल आणि त्यात ३ जीबी डेटा, कॉल्स आणि एसएमएस  हे फ्री असेल तर ५६ दिवसांचा प्लॅन ६६६/- रुपयांना असेल पण त्यात ग्राहकांना प्रत्येक दिवसाला २ जीबी डेटा मिळेल.

दिवसाला २ जीबीचा ८४ दिवसांचा प्लॅन फ्री कॉल्स आणि एसएमएस सोबत ८८८/- रुपयांना असेल आणि तोच प्लॅन पूर्ण वर्षभरासाठी २५९९/-रुपयांना असेल.

५६ दिवसांचा डेटा अॅड ऑन प्लॅन data add-on plan ५४९/- रुपयांना असेल त्यात ग्राहकांना १.५  जीबी डेटा दिवसाला मिळेल पण त्यात फ्री कॉल्स आणि एसएमएस ची सुविधा मात्र मिळणार नाही.  

लक्षात घेण्याची बाब ही असेल की हे नवीन प्लॅन्स १ सप्टेंबर २०२१  पासून लागू होतील. ज्यांचं सध्याचं Disney+hotstar चा प्लॅन चालू आहे असे ग्राहक त्यांचा प्लॅन संपेपर्यंत त्याचा फायदा घेऊ शकतात आणि तोपर्यंत त्यांचं सब्स्क्रिप्शन संपत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *