things to avoid while checking in and out hotel room
शेअर करा.

हल्ली लॉकडाऊन उठवलं आहे आणि सगळीकडे आता सर्व गोष्टी पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहेत.

अशातच लोक आपले रखडलेले बाहेर जाण्याचे आणि नवीन ठिकाणे फिरण्याची प्लॅन्स बनवताना दिसत आहेत.

बाहेर ट्रीपसाठी किंवा एखाद्या बिजनेस मीटिंगसाठी गेल्यावर साधारणपणे आपण राहण्यासाठी एखादी हॉटेल रूम बूक करतो. तुम्हीही करत असाल. तेव्हा आज खास काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळावयाच्या आहेत जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन किंवा चेक आउट करता.

त्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.

things to avoid while checking in and out hotel room
things to avoid while checking in and out hotel room, image source:access-is.com

चेक इन करताना स्वतःबद्दल माहिती नीट न देणे:

कधी कधी काही लोक हॉटेलमध्ये रूम बुक करताना आपण आपली खरी ओळख लपवतो. कधी तर आपण आपला खरा मोबाईल नंबर पण देऊ करत नाही.

पण या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कधी केव्हा आपण कोणत्या मुश्किलीत सापडेल आणि आपल्याला आपल्या खोट्या महितीमुळे आणखीन संकटांचा सामनाही करावा लागेल. त्यामुळे शक्यतो आपली माहिती खरी खरी देण्याचा प्रयत्न करा.

मित्र-मित्र, मैत्रिणी-मैत्रिणी किंवा एक कपल म्हणून जात असाल तर आपल्या घरच्यांचा नंबर देणेही योग्य ठरेल.

हे पण वाचा:

ई पीक नोंदणी करता पुन्हा मुदतवाढ

एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे नेमकं काय?

यशराजने दिली रणबीरच्या शमशेराची पहिली झलक

मग येताय का पिक्चर बघायला?

हॉटेल रूमची पडताळणी न करणे:

कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे आपण आपल्या हॉटेल रूमची नीट पडताळणी करत नाही. शक्यतो असं कुणी करत नाही पण कधी कधी तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपे कॅमेरे लावलेले असतील तर त्यामध्ये तुमचे भलतेच क्षण कैद होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या मोबाईल मध्ये काही अॅप्स मिळतात ज्यात रूममध्ये लावलेले छुपे कॅमेरे आपल्याला कळून येतात. त्याचा आधार घेऊन तुम्ही संभाव्य धोका टाळू शकता.

हॉटेल रूम मधील वस्तु सोबत नेणे:

आपल्या मेहमान नवाजीसाठी हॉटेल प्रशासन आपल्या हॉटेल रूम मध्ये काही वस्तु ठेवत असते. त्या गोष्टी असू शकतात साबण, शांपु, रुमाल, टॉवेल, परफ्यूम वगैरे वगैरे.

जेव्हा तुम्ही हॉटेलमधून चेक आउट करणार असाल तेव्हा अशा तत्सम गोस्तही आपल्या सोबत नेणे टाळा.

चुकून हॉटेल प्रशासनाकडून तुमची झडती गेली तर तुम्हाला एका मोठ्या लाजिरवाण्या कक्षणाचा सामना करावा लागेल हे निश्चित आहे.

चेकआउट करताना हॉटेल रूम न पडताळणे:

जेव्हा तुम्ही शेवटचं चेकआउट करणार असाल तेव्हा एकदा आपल्या हॉटेल रूमची नीट पडताळणी करणे खूप आवश्यक असते. समजा हॉटेल सोडल्यानंतर तुम्हाला विमानाने दुसऱ्या शहरात जायचे असेल आणि तुमचे काही समान जर चुकून तिथे राहिले असेल तर मात्र तुम्हाला उगाच मनस्ताप सहन करावा लागेल. कडची तुमचं विमानाचं किंवा रेल्वेचं टिकीतही रद्द करण्याची नऊबत येऊ शकते.

त्यामुळे कटाक्षाने एकदा हॉटेल रूम सोडताना आपल्या काही गोष्टी तिथे विसरल्या नाहीत न याची नीट पडताळणी करून घ्या.

स्टाफ व कर्मचाऱ्यांशी व्यवहार नीट न ठेवणे:

हॉटेल मध्ये आपण अतिथि असता तेव्हा आपण उगीच हॉटेलच्या स्टाफ आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे टाळा. उलट त्यांच्याशी नीट व्यवहार करा. तेथील स्वागत कर्मचाऱ्यांची चंगळे संभाषण ठेवा.

आपण कधी इन करता कधी आउट करता याबद्दल त्यांना अपडेट देत जा.

चेकआउटच्या वेळी बिल नीट न पाहणे:

सर्वांत महत्वाचे म्हणजे चेक आउटच्या वेळचे बिल ही तेव्हा नीट तपासून घ्या. आपण मुक्कानी असताना काय काय मागवतो याच्या नोंदी ठेवा. काय गोष्टींवर हॉटेल वेगळे चार्ज लावते याचीही माहिती ठेवत चला म्हणजे जेव्हा तुम्ही होते सोडल आणि बिल तुमच्यासमोर असेल तर तुम्ही कोणते कोणते इतर खर्च केले आहेत त्याची तुम्हाला महिती असेल आणि अव्वाच्या सव्वा बिलापासून तुमची सुटका होईल.

tags:

things to avoid while checking in and out the hotel room, hotel check in, hotel check out, things to be avoided, hotels near me, best hotels to stay, hotels in pune, hotels in mumbai,

One thought on “हॉटेलमध्ये चेक इन आणि चेक आउट करताना हे टाळा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *