येत्या २२ ऑक्टोबरनंतर राज्यातील चित्रपटगृहे होणार खुली.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांची माहिती. CM of Maharashtra.
कालच राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे येत्या नवरात्र उत्सवाच्या Navratri पहिल्या दिवसापासून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलं होता आणि राज्यातील सर्व भाविकांना आणि श्रद्धाळू लोकांना आनंदाची बातमी दिली होती.

आज पुन्हा ठाकरे सरकारने एक आनंदाची बातमी good news दिली आहे आणि ती म्हणजे राज्यातील चित्रपटगृहे येत्या २२ ऑक्टोबरनंतर खुली करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. Theatres in Maharashtra to be open from 22nd October.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या Second wave of corona तडाख्यामुळे चित्रपटगृहे theatres बंद ठेवली गेली होती. मधल्या काळात चित्रपटगृहांचे मालक आणि त्यांचे कर्मचारी यांची खूप परवड झालेली पहायला मिळाली होती. चित्रपटगृहांमध्ये कोणतेही चित्रपट कोरोनामुळे दाखवले जात नव्हते.
मात्र आज सरकारने त्यांचा विचार करून आणि कोरोनाचा कमी होणारा आकडा पाहून पण त्याचे सर्व घालून दिलेले नियम पाळत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांनी या संदर्भात एक ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.
शासनाच्या या निर्णयाचे चित्रपटगृह मालक आणि कर्मचारीवर्ग तसेच सिनेरसिकांच्यात एक आनंदाचं वातावरण पसरले आहे.
हे पण वाचा:
राज्यातील मंदिरांच्या बाबतील महत्वपूर्ण निर्णय
सत्तर रुपये वारून झाली ३३ वर्षे
विद्यापीठात अहिल्यादेवींचा शस्त्रधारी अश्वारूढ पुतळाच व्हावा- पडळकर
Matrix येणार तब्बल 18 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला,The Matrix Resurrections चा ट्रेलर
बॉलीवूड तसेच मराठी आणि बाकी प्रादेशिक भाषांतील अनेक बड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शनाविना रखडून पडले होते मात्र आता चित्रपटगृहे खुली होणार म्हटल्यावर त्यांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे आहे असं म्हणायला काही करकट नाही. upcoming bollywood films
हिंदीतील मोठा दिग्दर्शक असलेल्या रोहित शेट्टी Rohit Shetty आणि त्याच्या टीमने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्याने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानले आहेत. आता त्याच्या बहुप्रतीक्षित सूर्यवंशी या चित्रपटाचा प्रदर्शनाचा Survyavanshi release date मार्ग मोकळा झाला आहे.

चित्रपटगृहे बंद असल्यामुळे काही चित्रपट मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म वरती प्रदर्शित झाले होते मात्र काही रसिकांच्या तक्रारी होत्या की त्यांना थिएटरची मज्जा लुटता येत नाही.
मराठीतील एक चित्रपट वितरक असलेले आणि त्रिकोणा पिक्चर्सचे मालक असलेले श्री. अवधूत दौंडे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून ते महाइन्फोशी बोलताना म्हणाले की आत्ता पुन्हा नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखे वाटत आहे. बऱ्याच महिन्यांतर आज आनंदाची बातमी मिळाली आहे.
बॉलीवूड बरोबरच आगामी काळात हॉलीवूडचे देखील खूप सिनेमे भारतातील चित्रपटगृहे खुली होण्याची वाट पाहत होते कारण त्यांच्या चित्रपटांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. आता त्यांच्याही प्रदर्शनाची वाट मोकळी झालेली आहे.
सरकारने आवाहन केले आहे की कोरोनाचे सर्व नियम पाळत आपण या गोष्टी खुल्या करत आहोत. नागरिकांनी सर्व नियमावली पाळत या गोष्टी कराव्या.