नुकताच The Matrix Resurrections या Matrix series च्या चौथ्या भागाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
1999 साली Matrix (The matrix movie) मालिकेतील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता.
सायन्स फीक्शन Science Fiction असलेल्या या चित्रपटास तेव्हा प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर 2003 सालापर्यंत त्याचे एकूण तीन भाग प्रदर्शित झाले होते. काल वॉर्नर ब्रदर्सने तब्बल 18 वर्षानंतर याच्या चौथ्या भागाचा ट्रेलर युट्यूबवर प्रदर्शित केला आहे.
कियानू रिव्ज Keanu Reeves , लॉरेन्स फिशबर्न Laurence Fishburne आणि कॅरि-अॅनी मॉस Carrie-Anne Moss यांच्या प्रमुख भूमिका असलेला The Matrix हा चित्रपट 31 मार्च 1999 ला अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. द्विमान पद्धतीचा वापर करत स्वप्नातून थेट एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करून उडालेला थरार यामध्ये दाखवला गेला होता.

Keanu Reeves ने साकारलेला निओ Thomas A. Anderson / Neo, Carrie-Anne Moss साकारलेली ट्रीनीटी Trinity आणि Laurence Fishburne ने साकारलेला मॉर्फीयस Morpheus प्रेक्षकांच्या अजूनही चांगलाच लक्षात राहिला आहे.

ट्रेलर इथे पहा:
प्रेक्षकांनी तेव्हा हा चित्रपट अगदी डोक्यावर घेतला होता. चित्रपट निर्मिती करताना वापरण्यात आलेली साहसदृश्ये Action Sequences, व्हिजुअल इफेक्टस Visual Effects-VFX यांनी तर धुमाकूळ घातला होता.
त्यानंतर 2003 साली त्या सिरीजचे 2 भाग लागोपाठ प्रदर्शित केले गेले होते. त्यांनाही अपेक्षेप्रमाणे उदंड प्रतिसाद मिळाला होता.
हे पण वाचा:
ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती
मुंबईच्या नव्याने सादर होणाऱ्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला सुचवा नाव
मधल्या काळात मात्र त्याच्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा झाली नव्हती. पण मात्र काल ट्रेलर रिलीज The Matrix Resurrections – Official Trailer 1 करून चित्रपट निर्मात्यांनी Matrix फॅन्सना एक सुखद धक्काच दिला आहे.
प्रियांका चोप्रा दिसणार The Matrix Resurrections मध्ये? Priyanka Chopra in The Matrix Resurrections

होय, ट्रेलरच्या दरम्यान काही फ्रेम्स मध्ये प्रियांका चोप्रा सुद्धा पाहायला मिळत आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही एक नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. काही हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये भूमिका करून तिने तिथेही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून या चित्रपटात तिची भूमिका म्हणजे तिच्या कामाची त्यांनी घेतलेली दाखलच म्हणावी लागेल.
The Matrix Resurrections कधी होणार रिलीज?
The Matrix Resurrections हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 22 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित केला जाईल. दोन पर्यायांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे कळवले आहे. पहिला म्हणजे चित्रपटगृहांत तो प्रदर्शित होईल आणि त्याचसोबत HBO वरतीही तो पहायला उपलब्ध असेल.
The Matrix Resurrections या चित्रपटात पुन्हा कियानू रिव्ज हाच मुख्य भूमिकेत असणार असून त्याच्या सोबतीला अभिनेत्री कॅरि-अॅनी मॉस देखील असणार आहे.
मागील तिन्ही भागांत मॉर्फीयसची भूमिका सकारणारे अभिनेते लॉरेन्स फिशबर्न हे या चित्रपटात दिसणार नाहीत. त्यामुळे मॉर्फीयसची भूमिका Yahya Abdul-Mateen II हा अभिनेता साकारणार आहे.