temples to be open from navratri
शेअर करा.

राज्य सरकारने घेतला राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय. Government Of Maharashtra

७ ऑक्टोबर दिवशी नवरात्रीच्या Navratri पहिल्या दिवसापासून राज्यातील मंदिरे Temples Of Maharashtra खुली करण्याचा निर्णय आज ठाकरे सरकारने घेतला आहे.

मागील बरेच दिवस राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंदच ठेवण्यात आली होती. परंतु बाकीच्या गोष्टी राज्य सरकारने सुरू केल्या होत्या मात्र राज्यातील प्रार्थनास्थळे मात्र उघडण्यास सरकारने कोणतीच भूमिका घेतली नव्हती.

temples to be open from navratri
temples to be open from navratri

या मुद्द्यावर विरोधकांनी Opposition Party वेळोवेळी सरकारला अगदी धारेवर धरलेही होते परंतु भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आणि आगामी शक्यता असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्य सरकार मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्यास असमर्थता दाखवत होते.

आता मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी झाली असून आपण आता सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करू शकतो असे सरकारने म्हटले आहे.

मागे बऱ्याचदा विरोधक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली करावी म्हणून सतत आक्रमक होत होते. त्यांनी त्यासाठी मंदिरे उघडा म्हणून घंटानाद आंदोलने भाजपने देखील केली होती. मात्र सध्या ही मंदिरे खुली न करता आरोग्याची मंदिरे खुली ठेवणे गरजेचे आहे असे सरकारने म्हटले होते.

मात्र आता सरकारने नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व भाविक भक्त यांच्यात उत्साहाचे वातावरण पसरले.

हे पण वाचा:

सत्तर रुपये वारून झाली ३३ वर्षे

विद्यापीठात अहिल्यादेवींचा शस्त्रधारी अश्वारूढ पुतळाच व्हावा- पडळकर

शेतकऱ्याच्या बांधावरून जेव्हा महादेव जानकर थेट कृषि मंत्र्यांना फोन लावतात

टाकाऊ पासून टिकाऊचा नारा देत साकारला पंतप्रधान मोदींचा पुतळा

मा. मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून यावर एक ट्विट करून त्यांनी हे जाहीर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.

ठाकरे सरकारने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्याही सूचना सर्व भाविक मंडळींना केल्या आहेत. आपण मंदिरे खुली करत आहोत पण कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे धार्मिक स्थळे जरी उघडी केलीगेली तरी भाविकांनी आणि प्रशासनाने त्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि नियमांचे काटेकोरपणे पालन होते आहे का हे पाहणे जारजेचे आहे.

सरकारच्या या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून जरा उशिरा का होईना सरकारने लोकांची भावना जाणून योग्य निर्णय घेतला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जनसामान्य लोकांतून उमटत आहेत.

आपल्याला सरकारचा हा निर्णय कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *