tata owns air india
शेअर करा.

टाटा कडून लागली सर्वाधिक बोली.

तब्बल चार वर्षांच्या काळानंतर मिळालं एयर इंडियाला मालक.

डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव पत्रकार परिषद घेत माहिती दिली की  एयर इंडियासाठी टाटा सन्स कडून सर्वाधिक म्हणजेच तब्बल १८ हजार कोटींची बोली लागली आणि एयर इंडियाचा ताबा आता पुन्हा टाटा कडे गेला आहे.

tata owns air india
tata owns air india, image source:business today

सन २०१७ साली भारत सरकारने एयर इंडियाला विकण्याचा निर्णय घेतलं होता आणि तेव्हापासून त्याच्या खाजगीकरणाला सुरवात झाली होती. परंतु मधल्या काळात तोट्यात चालणाऱ्या एयर इंडियाला विकत घेण्यासाठी कुणी धजवत नव्हते कारण एवढी मोठी एयर लाईन्स चालवणे म्हणजे एखादा हत्ती पाळल्यागत अवस्था होणार होती. पण पुन्हा तिच्या खरेदीसाठी काही बड्या कंपन्यांनी इच्छुकता दर्शवली.

त्यात टाटा सन्स कडून सर्वाधिक बोली लागल्याने पुन्हा त्याची मालकी टाटाकडे गेली तीही तब्बल ६८ वर्षांनी.

सन १९५३ साली भारत सरकारने टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी खरेदी केली होती.  

स्थापना:

१९३२ साली एयर इंडियाची स्थापना टाटा एयर सर्विसेस म्हणून करण्यात आली होती. तेव्हाचे टाटाचे सर्वेसर्वा असलेले जे आर डी टाटा यांनी त्याची स्थापना केली होती.

त्यांतर तिचे आता एयरलाईन्स असे त्यांनी नामकरण केले.

हे पण वाचा:

या पाच सवयी तुम्हाला चांगला फोटोग्राफर बनवतील

हॉटेलमध्ये चेक इन आणि चेक आउट करताना हे टाळा

ई पीक नोंदणी करता पुन्हा मुदतवाढ

एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे नेमकं काय?

पहिल्या प्रथम टाटाकडून त्याचा वापर मेल सर्विससाठी करण्यात आला होता. १५ ऑक्टोबर १९३२ साली कराची ते मुंबई असे उड्डाण करून मेल वाहतूक करण्यात आली होती. आणि त्याचे पायलट होते ते म्हणजे टाटांचे मीतर असलेले पायलट नेविल विनसेंट.

पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला.

१९५३  मध्ये मालकी सरकारने घेतली:

भारत सरकारने  १९५३ साला मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला व टाटा सन्स कडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली . जे आर डी टाटा त्याचे १९७७ पर्यंत अध्यक्ष राहिले. नंतर कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले.

एअर इंडियाचे नाव बदलले:

 एयर इंडिया इंटरनॅशनल ने आपल्या ताफ्यात पाहिले बोईंग ७०७-४२० समाविष्ट केले ते २१ फेब्रुवारी १९६० साली. विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी न्यूयॉर्कला सेवा सुरू केली. मग ८ जून १९६२ ला एयर लाईन्स चे नाव अधिकृतपणे एयर इंडिया असे करण्यात आले. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स 2007 मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली.

२०१७ मध्ये खासगीकरणासाठी सरकारची मान्यता:

यानंतर 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिली. वर्ष 2018 मध्ये एअर इंडियाला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अयशस्वी ठरला. त्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली

एअर इंडियावर एकूण 38,366.39 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडिया अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडच्या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) ला 22,064 कोटी रुपये हस्तांतरित केल्यानंतर एवढी रक्कम उरते. जर एअर इंडियाला विकलं नसतं तर सरकारकडे तिला बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *