गावसकरांनी केली सौरव गांगुलीची तक्रार
शेअर करा.

म्हणाले, बीसीसीआय चे अध्यक्ष (BCCI President) होऊनपण सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) असं केलं.

भारताचे माजी क्रिकेटपट्टू सुनील गावसकर हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. त्यांची गणना क्रिकेट जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते.

गावसकरांनी केली सौरव गांगुलीची तक्रार
Image credits: scroll.in गावसकरांनी केली सौरव गांगुलीची तक्रार

त्याचं असं झालं की सोनी टेन 3 (SONY TEN 3) या क्रीडावाहिनीला त्यांनी व भारताचा माजी सलामीवीर आणि विस्फोटक फलंदाज विरेन्द्र सेहवाग यांनी दिलेल्या एका मुलाखतीत बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुलीबाबत (Sourav Ganguly) एक तक्रार केली आहे.

तक्रारीचं कारण होतं ते मिष्टी दोईचं (Mishti Doi) जी आहे बंगालची खूप प्रसिद्ध डिश!

गावसकर म्हणाले की जेव्हा ते भारतीय संघाचे कर्णधार होते तेव्हा जेव्हा कधी पण ते कसोटी खेळण्यासाठी बंगालला जायचे तेव्हा विमानतळावर बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी असलेले सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) वडील त्यांच्या स्वागतासाठी यायचे.

पाच दिवसांची कसोटी आणि त्याआधीचे तीन दिवस असे मिळून एकूण आठ दिवस त्यांचा मुक्काम हॉटेलला असायचा तेव्हा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी असूनपण ते खास त्यांच्यासाठी त्या हॉटेलच्या फ्रीजमध्ये मिष्टी दोईची (Mishti Doi) एक मोठी हंडीच भरून ठेवायचे.

मिष्टी दोई (Mishti Doi) सोबत त्यांनी रसगुल्ल्यांचाही आवर्जून उल्लेख केला.

गांगुली बाबत माझी तक्रार आहे असे म्हणत ते पुढे म्हणाले की, वडील सेक्रेटरी असताना ते माझ्यासाठी एवढं सगळं करायचे आणि आता तर खुद्द सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआय चे अध्यक्ष (BCCI President) असूनही माझ्यासाठी काहीच घेऊन येत नाहीत.

हे पण वाचा:

खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा

सोनालीच्या बिकीनी फोटोने नेटकरी झाले घायाळ

टोकियो ऑलिम्पिकचं दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन.!

यावर स्टुडिओ मध्ये एकच हशा पिकला. सेहवागने तर खळखळून दाद देत त्यांनी दादा म्हणजे गांगुलीला सांगितलं की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सनी दा किंवा मला भेटायला याल तेव्हा येताना मिष्टी दोई (Mishti Doi) आणायला विसरू नका.

त्यावर सनी दा नी रसगुल्ला पण आणायला विसरू नका म्हणून आवर्जून सांगितले.

गांगुलीने मात्र यावर अजून कोणती प्रतिक्रिया दिली नाही.

One thought on “गावसकरांनी केली सौरव गांगुलीची तक्रार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *