SPIDER-MAN NO WAY HOME
शेअर करा.

मार्वेल स्टुडियोज- Marvel Studios च्या स्पायडर मॅन- Spider-Man सिरीजचा तिसरा भाग म्हणजेच स्पायडर मॅन नो वे होम- Spider-Man No Way Home हा असणार आहे.

मार्वेल स्टुडियोज- Marvel Studios आणि सोनी पिक्चर्स-Sony Pictures यांची सहकलाकृती असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची मार्वेल फॅन्सना-Marvel Fans खूप उत्सुकता लागून राहिली होती.

या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीजर कम ट्रेलर- SPIDER-MAN: NO WAY HOME – Official Hindi Teaser Trailer आजच युट्यूब- Youtube वरती प्रदर्शित करण्यात आला आहे.

हा मार्वेलच्या चौथ्या फेजमधील-MCU Phase 4 चित्रपटांपैकी एक चित्रपट असणार आहे.

फॅन्सना जेवढी उत्सुकता ट्रेलरची लागली होती आता ट्रेलर पाहून मात्र त्यांना त्याहूनही अधिक उत्सुकता चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची लागली आहे.

स्पायडर मॅन फार फ्रॉम होम या मागच्या भागात चित्रपटाचा खलनायक मिस्टीरिओने शेवटी स्पायडर मॅनची ओळख त्याचं नाव उघड करून साऱ्या जगापुढे करून दिली होती.

source: internet

मिस्टीरिओचं खरं रूप जगाला माहीत नसल्याने लोक स्पायडर मॅनलाच त्याचा खूनी मानत असतं.

एकतर पिटर पार्कर-Peter Parker हाच स्पायडर मॅन आहे हे जगाला माहीत झालेलं असतं आणि त्यात मिस्टीरिओचा मृत्यू त्याच्यामुळे झाला अशी लोकांची खोटी समजूत झालेली असते.

त्यामुळे पिटर पार्करच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू झालेली असते.

हे पण वाचा:

आणि तो फोटो आजही जपानी लोक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात

येत आहे मराठी भाषेतलं हक्काचं ओटीटी (OTT)

सेहवागचं कोहली बद्दलचं ट्विट होतंय व्हायरल

यातून काही मार्ग काढण्यासाठी तो आपला जुना सहकारी डॉक्टर स्ट्रेन्जकडे-Doctor Strange जाऊन लोकांच्या मनात असलेली त्याची ओळख पुसण्यासाठी तो त्याची मदत घेतो असं काही ट्रेलर मध्ये दाखवलं आहे.

ट्रेलरमध्ये अजून एक जबरदस्त थियरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो म्हणजे मल्टिव्हर्स.

अजून एक जबरदस्त आणि लोकांना कोड्यात पाडणारी बाब म्हणजे या ट्रेलरमध्ये एक चेंडू पडताना दाखवला असून मागे ग्रीन गोबलिनच्या हसण्याचा आवाजही येत आहे. शिवाय डॉक ऑकचीही अचानक झालेली एंट्री अजूनच उत्सुकता वाढवणारी आहे.

source: internet
source: internet
source: internet

ही सर्व खलनायकी पात्रे २००३ साली आलेल्या आणि अभिनेता टोबी मग्वायरची-Tobey Maguire प्रमुख भूमिका असलेल्या स्पायडर मॅन सिरीज मधली पात्रे होती.

मात्र नंतर आलेल्या आणि अभिनेता अँड्रयू गारफील्डची-Andrew Garfield मुख्य भूमीका असलेल्या स्पायडर मॅन सिरीज मधली पात्रे मात्र दाखवली गेली नाहीत.

एकंदरीत पिटर पार्करची ओळख लोकांच्यातून पुसताना डॉक्टर स्ट्रेन्ज कडून कदाचित तो मंत्र चुकला गेला असावा असा अंदाज आहे.

पण ट्रेलरच्या शेवटी एक डायलॉग आहे काही मागण्याच्या आधी विचार करून मागितलं पाहिजे पार्कर!

यातून हे नक्की स्पष्ट झालंय की या चित्रपटात आपल्याला एकापेक्षा अधिक खलनायक आणि कदाचित एक न्हवे तर दोन न्हवे तर तीन-तीन स्पायडर मॅन पाहायला मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

या वर्षी १७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या मार्वेल सिनेमॅटिक यूनिवर्स च्या चौथ्या फेजच्या- MCU Phase 4 चित्रपटात अजून काय काय पाहायला मिळणार हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *