source: Instagram
शेअर करा.

सोनाली कुलकर्णी

Marathi Actress Sonalee Kulkarni Posts bikini photos on Instagram

हल्लीच्या इंस्टाग्राम, टिक टॉक, शेअर चॅटच्या जमान्यात प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या काही घटना, प्रसंग, क्षण हे सोशल मिडियावरती टाकत राहतो. सेलेब्रिटीही आपल्या फॅन्स ना खुश करण्यासाठी सोशल मिडियावरती व्यक्त होत असतात.

आजपासून काही काळ मागे पहिलं तर मराठी अभिनेत्री आणि बिकीनी हे समीकरण अगदी दुरदूरपर्यंत नव्हतं. पण अलीकडच्या काळात हा ट्रेंड बदलताना पाहायला मिळतो आहे.

बॉलीवूड तारका आणि बिकिनी हे आपल्याला काही नवे नाही. एखादी तारका बाहेर देशात सुट्ट्या व्यतीत करायला गेली तर समुद्रकिनारी तिचे हमखास बिकीनी वरचे चारदोन फोटो तरी इंस्टाग्राम वरती येतातच.

सोबत हेही वाचा

अवघ्या बाराव्या वर्षी तिने जिंकलं ऑलिंपिक पदक

Money Heist येतोय लवकरच आपल्या भेटीला

eRupi: Digital payment क्षेत्रात मोदी सरकारचं मोठं पाऊल.

सचिनच्या जीवनात आला एक स्पाईक

बॉलीवूड तारकाच काय पण हल्ली हिंदी मालिकेमधील अभिनेत्री पण याला अपवाद नाहीत.

आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या आपला नवरा कुणाल बिनोडेकर सोबत मालदीव मध्ये वेकेशनची मजा लुटत आहे.

सांगण्याचं कारण की Kandima Maldives ला टॅग करत तिने कुणालचा हात हातात घेत आपला फ्लोरल बिकीनी फोटो इंस्टाग्राम वरती शेअर केला आहे.

तिचा फोटो पाहून नेटकरी मात्र पुरते घायाळ झाले असून त्यावरती कमेंट्स आणि लाइक्स चा अक्षरशः पाऊस पडला आहे.

मराठीची पहिली बिकीनी गर्ल सई ताम्हणकर हिने तिला Hello Hotness असे म्हणत कमेंट केली आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने पण त्यावरती कमेंट केली आहे.

source: Instagram

त्यानखेरीज अजून बॉलीवूड अभिनेत्री गौहर खाननेही त्यावर कमेंट केली असून अमेय वाघ ने केलेली कमेंट पाहण्याजोगी आहे.

source: Instagram

हळू हळू मराठी अभिनेत्री पण आपल्या चौकटी ओलांडून बाकीच्या अभिनेत्रींशी स्पर्धा करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत मराठी चित्रपट सृष्टीला भविष्यात ग्लॅमर नक्की प्राप्त होईल असं दिसतंय. आता सोनालीला वेकेशनची मजा लुटू देऊयात.

One thought on “सोनालीच्या बिकीनी फोटोने नेटकरी झाले घायाळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *