Tokyo Summer Olympics 2020, Sky Brown
Sky Brown, वयाच्या बारा- तेराव्या वर्षी आपण आपल्या पाल्याकडून किंवा एखाद्या मुला-मुलीकडून फार फार तर काय अपेक्षा ठेवू शकतो.? अभ्यास नीट मन लावून करणे आणि चांगले मार्क्स घेऊन पुढे जात राहणे. होय ना?
ते तर करायलाच हवं. खरंतर विषय निघण्याचं कारण म्हणजे जपानच्या टोकियो इथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेतल्या त्या मुली.

आज ऑलिंपिकमध्ये स्केटबोर्डिंगच्या वुमन्स पार्क फायनल मध्ये स्काय ब्राऊन (Sky Brown) हिने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कास्य पदकाला गवसणी घातली आहे.
पदक मिळवल्यानंतर ग्रेट ब्रिटनतर्फे सर्वांत कमी वयात पदक मिळवणारी खेळाडू ठरली आहे, शिवाय स्केटबोर्डिंग मध्येही पदक मिळवणारी ती पहिली ब्रिटिश खेळाडू ठरली आहे.
त्यात अजून विशेष बाब म्हणजे तिच्यासोबत जिने रौप्य पदक मिळवले ती कोकोना हिराकी (Kokona Hiraki) ही तर अवघ्या बारा वर्षांची आहे. रौप्य पदक जिंकून ती सुद्धा जपानची पदक जिंकणारी सर्वांत तरुण खेळाडू ठरली आहे.
शिवाय ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी १९३६ नंतरची ती सर्वांत लहान खेळाडू सुद्धा ठरली आहे.
हे तुम्हाला माहिती आहे का?
स्केटबोर्डिंग हा क्रीडा प्रकार टोकियो ऑलिंपिक मध्ये पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या क्रीडा प्रकाराचे एकूण तीन ईवेंट्स झाले असून झालेल्या तिन्ही ईवेंट्समध्ये जपाननेच सुवर्ण पदके काबीज केली आहेत.
हे वाचलं का?
eRupi: Digital payment क्षेत्रात मोदी सरकारचं मोठं पाऊल.
Money Heist येतोय लवकरच आपल्या भेटीला
सलमान ने ट्विट केला जीम वर्कआउटचा व्हिडिओ
याच इवेंट मध्ये जपानच्या सकुरा योसोझुमी (Sakura Yosozumi) हिने सुवर्ण पदक मिळवले आहे. विशेष म्हणजे मैदानावरील तिन्ही स्पर्धकांचे एकूण वय पाहिलं तर ते केवळ ४४ वर्षे होते.
वडील ब्रिटिश आणि आई जपानी असलेल्या स्काय ब्राऊन हिने पदक जिंकल्यानंतर मला घरी आल्यासारखे वाटते आहे असं म्हटलं असून पुढे ती हेही म्हणाली की,” कुणीही स्केटिंग करू शकतो. त्याला ठराविक ऊंची आणि वय असण्याचं कारण नाही. तुम्ही हे कधीही करू शकता. फक्त पायाखाली स्केटबोर्ड घेऊन मैदानावर यायचे आहे.”
[…] […]
[…] […]
[…] […]
Wad 5 chi sir……