आठ वर्षांनंतर होणार आपल्या पत्नीपासून विभक्त.
भारताचा आघाडीचा सलामीवीर आणि डावखुरा फलंदाज शिखर धवन ने आपला आठ वर्षांचा संसार संपुष्टात आणला आहे. आपली पत्नी आयेशा मुखर्जी आणि त्याने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
धवनने २०१२ साली पेशाने बॉक्सर असलेल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न स्थित असलेल्या आयेशा मुखर्जी सोबत विवाह केला होता. सोबतच त्याने तिच्या आधीच्या लग्नापासून असलेल्या दोन्ही मुलींना देखील दत्तक घेतले होते.

लग्नानंतर त्या दोघांना एक मुलगाही असून त्यांनी त्याचं नाव झोरावर ठेवलं आहे. ANIच्या वृत्तानुसार आयेशा मुखर्जीने आपल्या Instagram पेजवर नवीन नाव Aesha Mukerji असे अपडेट केलं आणि ही बातमी पसरली.
हे पण वाचा:
मुंबईच्या नव्याने सादर होणाऱ्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला सुचवा नाव
महिंद्राच्या ‘थार’ला टक्कर द्यायला येणार ही गाडी
टकाटक दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आहे ‘एक नंबर’
jio युजर्सना आता नव्या प्लॅन्सवर मिळणार संपूर्ण Disney+hotstar चा खजिना.
आपला दूसरा सलामीवीर रोहित शर्मा सोबत जवळपास एक दशकभर शिखर ने सलामी दिली आहे. मागील श्रीलंका दौऱ्यावर धवनने तिथे पाठवलेल्या भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती.
तसंही शिखर आपल्या फलंदाजीच्या हटके स्टाईल आणि आपल्या मिशीला पीळ देण्याच्या वेगळ्या पद्धतीने क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
आगामी T20 स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होण्याकडे धवनचे लक्ष असेल. पुन्हा एकदा रोहित बरोबर सलामी करणे त्याचं उद्दिष्ट असेल.