SBI PO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) ने प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer – PO) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. या भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप, आणि इतर सर्व माहिती येथे दिली आहे.
रिक्त पदांची सविस्तर माहिती:
- पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
- एकूण रिक्त जागा: 600
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.
- जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष किंवा अंतिम सेमेस्टरमध्ये आहेत, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
वयोमर्यादा:
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे.
- आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट:
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 5 वर्षे सूट
- इतर मागासवर्गीय (OBC): 3 वर्षे सूट
- अपंग व्यक्ती (PWD): विशेष श्रेणीनुसार वयोमर्यादेत अतिरिक्त सूट
पगार:
- प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मासिक वेतन ₹48,480/- ते ₹85,920/- असेल.
- या वेतनासोबतच इतर भत्ते जसे की DA, HRA, CCA, आणि बँकेच्या नियमानुसार अतिरिक्त लाभ दिले जातील.
परीक्षा शुल्क:
- सामान्य (General)/ओबीसी (OBC)/EWS: ₹750/-
- अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST)/अपंग (PWD): शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण:
- भारतभरात कुठेही नोकरीसाठी उमेदवाराला नियुक्त केले जाऊ शकते.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 जानेवारी 2025
- पूर्व परीक्षा: 8 मार्च 2025 आणि 15 मार्च 2025
- मुख्य परीक्षा: एप्रिल/मे 2025
अर्ज प्रक्रिया:
- उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या: https://sbi.co.in/
- अर्ज करताना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थित भरून अंतिम सादरीकरण करावे.
परीक्षेचे स्वरूप:
1. पूर्व परीक्षा (Preliminary Exam):
- बहुपर्यायी स्वरूपात (MCQs) होणारी ऑनलाइन परीक्षा.
- विषय: इंग्रजी भाषा, गणित, आणि तार्किक क्षमता.
- वेळ: 1 तास.
2. मुख्य परीक्षा (Main Exam):
- ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात होईल.
- विषय: तर्कशक्ती, अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान, इंग्रजी, आणि माहिती तंत्रज्ञान.
3. मुलाखत (Interview):
- मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
महत्त्वाचे दुवे:
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लीक करा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लीक करा