शेअर करा.

बॉलीवूडचा हँडसम हंक सलमान खानने दिला आहे चाहत्यांना एक सुखद धक्का!


सलमान खानने नुकताच एक व्हिडिओ आपल्या ट्वीटर हॅण्डल वरून ट्विट केला आहे.

त्या व्हिडिओला त्याने, I think this guy is training for tiger 3 असं शिर्षक देऊन तो पोस्ट केला आहे.
यश राज फिल्म्सच्या बॅनर खाली पहिल्यांदा २०१२ साली Ek Tha Tiger हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट ईदच्या वेळेस प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यात सलमानने अविनाश सिंग राठोड उर्फ Tiger हा भारतीय गुप्तहेरचा रोल केला होता तर सोबत कतरिना कैफ हिने झोया बनून एका पाकिस्तानी लेडी गुप्तहेराची भूमिका निभावली होती.


दोघे पुढे जाऊन योगायोगाने एकमेकांच्या प्रेमात पडतात व तिथून सुरू होतो त्यांच्या पाठलागाचा खेळ.!तेव्हा त्या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई केली होती. तिथून मग त्याची फ्रँचाइसी सुरू झाली.


त्यानंतर डिसेंबर २०१७ साली आलेल्या Tiger Zinda Hai या चित्रपटामध्ये भारतीय नर्सेस च्या अपहरणाचा विषय होता. तो चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता. अर्थातच त्याही चित्रपटाने भरगोस कमाई केली होती.


या वर्षीच्या मे महिन्यात सलमानचा अभिनेत्री दिशा पाटणी बरोबरचा Radhe: The Most Wanted Bhai हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. Covid च्या कारणाने तो चित्रपट Zee5 या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित केला गेला होता.

ईदच्या आदल्या दिवशी सलमानने आपल्या ट्वीटर व इन्स्टाग्राम हॅंडल वरुण एक २२ सेकंदाचा जीम वर्कआउटचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये त्याचा चेहरा नीटसा दिसत नसला तरी त्याच्या चाहत्यांना त्याला ओळखणे कठीण जाणार नाही! वयाच्या ५५ व्या वर्षी सुद्धा सलमानचा फिटनेस कमालीचा आहे यात शंका नाही!


इन्स्टाग्राम वरल्या त्याच्या व्हिडिओला आत्तापर्यंत जवळपास ४.२ दशलक्ष लोकांनी पहिलं आहे!
यावरून चाहत्यांनी एक गोष्ट नक्की समजावी की Tiger फ्रँचाइसीचा पुढचा चित्रपट लवकरच त्यांच्या भेटीला येणार आहे!

गुप्तहेरांबद्दल हे वाचलं नसेल तर नक्की वाचा

Pegasus बद्दल तुम्हाला काय माहिती आहे?

One thought on “सलमान ने ट्विट केला जीम वर्कआउटचा व्हिडिओ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *