मराठमोळा अभिनेता आणि बॉलीवूड हीरो रितेश देशमुख याने एका नव्या कोऱ्या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. actor Riteish Deshmukh announces his directional debut ved movie download
पण अभिनेता म्हणून नाही तर एक दिग्दर्शक म्हणून तो आपला पहिला चित्रपट करणार आहे.

रितेश देशमुखने एक ट्विट करीत आपण दिग्दर्शनात पदार्पण करतो आहोत याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
२००३ साली तुझे मेरी कसम tuze meri kasam या चित्रपटाद्वारे त्याने आपले पहिले पाऊल चित्रपटसृष्टीत ठेवले होते. त्याच्यासोबतच तेव्हा त्याची सहअभिनेत्री असलेल्या जिनीलिया डिसूझा हिनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
त्यानंतर रितेशने बॉलीवूड मध्ये खूप सारे चित्रपटही केले. खासकरून विनोदी चित्रपट हा त्याचा हातखंडा होता. शिवाय जिनीलिया देखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये व्यस्त झाली. south indian acterss
दोघांनी मिळून बॉलीवूडमध्ये मस्ती mastii, तेरे नाल लव हो गया tere naal love ho gaya असे चित्रपट केले आहेत.
२०१२ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. आणि आजतागायत त्यांचे नाते चांगले टिकून आहे. चित्रपटसृष्टीतील एक प्रेमळ जोडपे म्हणून त्यांना पाहिले जाते.
तर रितेश आपल्या ट्विटमध्ये एक फोटो शेअर करून सांगतो की, साधारणपणे २००१ साली मी पहिल्यांदा कॅमेऱ्यापुढे उभा राहिलो. तेव्हा मनात भीती, उत्सुकता आणि जिद्द होती. ते एक वेद वाटलं त्यावेळी सर्वांना आणि नंतर आपल्या सर्वांच्या प्रेमाने ते वेद जीवंत राहिले. download ved marathi movie
तो आपल्या चित्रपटाची घोषणा करताना म्हणतो की २०२१ साली मी कॅमेऱ्यामागे जायचं ठरवलं आणि तेव्हा ही मनात भीती आणि जिद्द, उत्सुकता होती.

असे म्हणत त्याने आपल्या वेड madness या चित्रपटाची घोषणा करून टाकली. सोबतच आपल्या रसिकप्रेक्षकांना आपल्यावर असेच प्रेम राहू द्या असे आवाहनही केले. marathi movie ved
त्याने घोषणा केलेल्या चित्रपटाचे नाव वेड असले तरी त्यात तो प्रेक्षकांना नक्कीच वेड लावील अशी अशा करायला हरकत नाही.
मुंबई फिल्म कंपनीची mumbai film company प्रस्तुती असलेल्या त्याच्या वेड या चित्रपटाचे तो स्वतः दिग्दर्शन करणार आहे. त्याचा विषय, कलाकार यांबद्दल अजून गोष्टी गुलदस्त्यात आहेत. पण लवकरच त्याच्याकडून याचीही माहिती मिळेल अशी अपेक्षा ठेवूया.
समुद्राच्या निळ्या पाण्यावर एक बोट तरंगतानाचा आणि त्या बोटीवर एक व्यक्ति पडलेला असा एक फोटो वेड या शीर्षकासह त्याने आपल्या ट्विटसोबत जोडून अजूनच उत्सुकता वाढवली आहे.
लय भारी मधून रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते आज तो स्वतः एक मराठी चित्रपट दिग्दर्शित करतो आहे ई बाब एक मराठी म्हणून आणि मराठीतून गेलेला कलाकार म्हणून रितेशसाठी खूप चांगली आहे. त्याच्या या पाऊलामुळे नक्कीच मराठी प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसळच असेल.
शिवाय रितेश सारख्या कलाकाराने मराठी चित्रपटांत लक्ष घालावे ही गोष्टही इथे महत्वाची आहे.
हे पण वाचा:
रितेश आणि जिनीलिया यांनी आणले शाकाहारी मटन
A trillion dollar mistake Yahoo made याहूच्या ट्रीलियन डॉलरच्या चुका तुम्हाला ठाऊक
सत्तरच्या दशकात या मॉडेलने जुहू बीचवर नग्न धावून खळबळ माजवली होती.
वाढलेल्या वजनामुळे भाग्यश्री झाली होती ट्रोल, दिले सडेतोड उत्तर
ट्विटसोबत अजून काही फोटो जोडत त्याने या चित्रपटाशी संलग्न काही नावे जाहीर केली आहेत ती म्हणजे जिया शंकर, जिनीलिया देशमुख, आणि स्वतः तो. ved movie songs
यामुळे अजूनच उत्सुकता वाढली आहे की या चित्रपटात जिनीलिया देशमुख ही रितेश सोबत आपले मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार का?
दिलेल्या माहितीनुसार वेड हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२२ ला प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले असून या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल ajay-atul यांचे संगीत लाभणार आहे.