वडोदऱ्यावरून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेसबाबत घडली घटना
रेल्वेच्या इतिहासात असं क्वचितच घडले आहे जेव्हा रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस उशिरा आलीय. घडले असे की एक जाहकामी मगर रेल्वे रुळावर आडवी आली आणि तिला मदत करण्याच्या निमित्ताने राजधानी एक्स्प्रेसला सुमारे 25 मिनिटांचा मुक्काम ठोकावा लागला.
जखमी झालेली मगर सरळ रेल्वे रुळावर आल्याने राजधानी एक्स्प्रेस तर थांबळीच पण त्याचबरोबर वडोदरा-मुंबई मार्गावरील सर्वच्या सर्व रेल्वे जवळपास 45 मिनिटांच्या फरकाने उशिरा धावल्या.
त्याचं असं झालं की मंगळवारी पहाटे 3:15 वाजता एका फोन कॉल द्वारे कर्जन रेल्वे स्थानकाला माहिती देण्यात आली होती की रुळावर एक आठ फूटी भली मोठी नर मगर जखमी अवस्थेत रुळावर पडलेली आहे. त्यानंतर लगेचच गस्तीवर असलेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्याने कर्जन मियागम स्टेशनपासून सुमारे पाच किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी ती मगर शोधून काढली.
त्यानंतर प्राणी मित्र असलेल्या नेहा पटेल आणि हेमंत वाधवणा यांनी घटनास्थळी भेट दिली.
डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे मगरीचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यात अजून ते ठिकाण हे खूप दुर्गम रित्या असल्यामुळे तिथे मदत पोहचवणे कठीण होते.
हे पण वाचा:
दरेकरांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून खरपूस समाचार
टाकाऊ पासून टिकाऊचा नारा देत साकारला पंतप्रधान मोदींचा पुतळा
Infosys ने जाहीर केले विद्यार्थ्यांसाठी Online course

वाधवणा पुढे बोलताना म्हणाले की जरी तो भर दुर्गम असला आणि आम्हाला तिथे पोहचणे लवकर शक्य नसले तरी महणी तात्काळ कर्जनला पोहचलो होतो.तिथे गेल्यावर आम्हाला रेल्वेच्या कामाने काहीसं चकित केलं जेव्हा आम्ही ऐकलं की एका मगरीसाठी त्यांनी चक्क राजधानी एक्स्प्रेस जोपर्यंत इच्छित मदत त्या स्थळावर पोहचट नाही तोवर चक्क 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अडवून ठेवली आहे.
कोणती तरी रेल्वे आधी तिच्यावरून जाऊन त्या मगरीला जखमी करून गेली होती. पाहणाऱ्यांनी सांगितले की तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि जबडाही तुटला होतं. तिथून पुढच्या काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला.

सध्या पावसाने ओढे, नदी, नाले हे भरून वाहत असतात. त्यातूनच मोठ्या तलावातील किंवा धरणातील एखादी मगर वाहत येऊन कधी तर चक्क त्या मानवी वस्तीत किंवा रानात वाहून येतात. तरी काठच्या नागरिकांनी अधिक सतर्क राहणे उचित ठरणारे असेल.
मागे एकदा टेंभु उपसा सिंचन प्रकल्पात कृष्णा नदीतून मगरी चक्क विटा, झरे, आटपाडी भागांत आलेल्या अफवा कानी आल्या