Planet-Marathi-OTT-to-launch-Five-Original-Web-Series-with-Contemporary-Topics-this-August
शेअर करा.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे असं म्हणायला हरकत नाही.

नेटफ्लिक्स (netflix), अमेझॉन प्राईम (amazon prime), डिझ्नी हॉटस्टार (disney+hotstar) यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स (OTT platform) नी तर अलीकडच्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

मागील जवळपास दीड वर्षांच्याहून अधिक कालावधीत चित्रपटगृहे तर बंद आहेत आणि त्याचाच फायदा घेत या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी तर नवनवीन सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित करण्याचा तर सपाटाच लावला आहे.

काय आहे ओटीटी ? What is OTT?

ओटीटी- Over The Top हा एक असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म (Online Platform) आहे ज्यात चित्रपट आणि मालिका हे त्या त्या प्रेक्षकांच्या मागणीनुसार हव्या त्या वेळेला त्यांना पाहता येतात. यात ओटीटी म्हणजे Over The Top याचा अर्थ असा होतो की कॉन्टेंट पुरवणारा यात इंटरनेट पुरवणाऱ्यापेक्षा वरती राहतो.

पूर्वी चित्रपटगृहांना पसंती देणारा प्रेक्षकवर्गही त्यामुळे आपसूकच ओटीटी कॉन्टेंट (OTT content) कडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स सध्या विविध भाषेतील वेब सिरीज (Web Series) आणि चित्रपट दाखवत आहेत; पण त्यात इंग्लिश आणि हिंदी हा कॉन्टेंट जास्त पहिला जातोय व बाकीचा कॉन्टेंट त्यांच्या तुलनेने कमी.

हे पण वाचा:

सेहवागचं कोहली बद्दलचं ट्विट होतंय व्हायरल

शासनाचा आदेश झुगारून आमदार गोपीचंद पडळकर करणार छकडा गाडी शर्यतींचं आयोजन

झोमॅटो वरून नुसतं जेवण ऑर्डर करता की झोमॅटोचे शेअर्स पण घेता?

मराठ्यांच्या अटकेपार झेंड्याच्या म्हणीची कहाणी

त्यातल्या त्यात मराठी कॉन्टेंट अजून कमी दाखवला जातो.

त्यामुळे मराठी कॉन्टेंटसाठी आपलं एक हक्काचं असं एखादं ओटीटी प्लॅटफॉर्म असावं अशी जणू निकडच वाटू लागली होती.

पण आता मराठी प्रेक्षकांची ही गरज लवकरच प्लॅनेट मराठी (Planet Marathi) या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीचे संस्थापक, निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी हे मराठी ओटीटी प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे असं गेल्या वर्षी जाहीर केलं होतं; पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला विलंब होत होता.

अखेर त्यांनी नुकतंच १५ ऑगस्टला जाहीर केलं आहे की ते येत्या ३१ ऑगस्टला प्लॅनेट मराठी ओटीटीला लाईव घेऊन येत आहेत आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी त्याला खुलं करणार आहेत.

काय असतील याचे दर?

१५ ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी याचं एक वर्षासाठीचं सब्स्क्रिप्शन ३६५/- रुपायांवरून थेट १९९/- रुपये असं केलं आहे आणि ही ऑफर त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत सुरू पण ठेवली आहे.

planet marathi
planet marathi
planet marathi
planet Marathi

आपल्या मराठी भाषेतील आपल्या हक्काच्या प्लॅनेट मराठी ओटीटीला त्यांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले असून नाममात्र किंमतीत त्याचं एक वर्षाचं सब्स्क्रिप्शन घेण्याचीही विनंती केली आहे.

मराठी भाषेतील पहिल्या वहिल्या ओटीटीला खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *