ola electric scooter
शेअर करा.

अवघ्या ४९९/- रुपयांत Ola Scooter बुक करा.

सध्या पेट्रोल-डिझेलच्या दराने आपलं नाबाद शतक पार केलंय आणि त्याने आपली घोडदौड पुढे तशीच चालू ठेवली आहे!
सामान्य नागरिकांना पेट्रोलचे दर कमी व्हावेत याची अपेक्षा असून किमान खिश्याला परवडतील या माफक दरात तरी पेट्रोल उपलब्ध व्हावे असं त्यांना मनोमन जरी वाटत असलं तरी आत्ताच्या घडीला ते शक्य तरी नक्कीच वाटत नाही!

साधारणपणे ७ वर्षे ग्राहकांना चांगली सेवा पुरवून त्यांनी २०१७ साली Ola Electric Mobility Private Limited ची घोषणा केली. आगामी काळातील इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा लक्षात घेता त्यांनी दोनएक वर्षांपूर्वी Ola Scooter चीही घोषणा केली होती.

source:Tweeter


तमिळनाडूच्या पोचमपल्ली इथे ओला इलेक्ट्रिकचं उत्पादन होणार आहे.

१५ जुलैला भाविश अगरवाल यांनी एक ट्विट करत ओला स्कूटर च्या बूकिंगला सुरवात केली होती. फक्त ४९९ रुपयांत हे बुकिंग करता येत आहे.

बूकिंग सुरू होऊन एक दिवस जातो न जातो तोच जवळपास एक लाखांहून ही अधिक लोकांनी तिचे बूकिंगही केले होते. आणि त्याबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानणारे ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

शिवाय ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना गाडी कोणत्या रंगात पाहायला आवडेल, एका चार्ज मध्ये गाडी किती किमी धावायला पाहिजे किंवा गाडीचे स्पीड किती हवे असे प्रश्न विचारून त्यांनी ग्राहकांची मतेही जाणण्याचा प्रयत्न केला आहे.

Source:tweeter
source:tweeter
source:Tweeter

शेवटी आगामी काळात एलेक्ट्रिक वाहनांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार यात काही शंका असण्याचे कारण नसणार आहे. अनेक नव्या कंपन्या आपलं नशीब अजमावण्यासाठी आपापल्या गाड्या बाजारात आणणार आहेत.

एका चार्ज ला येणारा खर्च, मेंटेनन्स खर्च व पर्यावरणाचा विचार करता EV गाड्या नक्कीच किफायती ठरतील यात दुमत असायचं कारण नाही. शिवाय प्रत्येक चार्ज मध्ये त्यांचं मायलेज ही चांगलं आहे.

सध्या दुचकीच्या क्षेत्रात महत्वाच्या कंपन्या असलेल्या हीरो, बजाज, टिव्हिएस, होंडा यांच्याकडूनही त्यांच्या नवीन EV गाड्यांच्या घोषणा होत आहेत किंबहुना काहींनी तर आपली मॉडेल्स बाजारात आणली देखील आहेत.

ग्राहकांची मते जिंकण्यात कोण यशस्वी ठरतंय हे आगामी काळात स्पष्ट होईलच!

हे ही वाचा:

टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतानं खातं उघडलं.!

तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. तुम्ही स्वत:ला सावरा.

Pegasus बद्दल तुम्हाला माहीत आहे का?

4 thoughts on “तुम्ही Ola Scooter बुक केली का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *