सोलापूरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. मेहबूब भाई शेख यांनी माढा तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
त्यांच्या या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस माढा तालुका यांच्या वतीने तिथे करण्यात आला. त्यांचा हा सन्मान राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष मा. संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. अरुण आसबे, वरिष्ट जिल्हा उपाध्यक्ष मा. अभिषेक आव्हाड यांच्या सोबत माढा तालुका, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस ओबीसी सेल चे माढा तालुका उपाध्यक्ष मा. अतुल कासवेद, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस ओबीसी सेल चे माढा तालुका कार्याध्यक्ष मा. अनिल तोडकर, टेंभुर्णी शहराध्यक्ष मा. मयूर काळे व राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस माढा तालुका चे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
हे पण वाचा:
महिंद्राच्या ‘थार’ला टक्कर द्यायला येणार ही गाडी
वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला तुम्हाला बरेच. . . – विशाल पाटील.
टकाटक दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आहे ‘एक नंबर’
jio युजर्सना आता नव्या प्लॅन्सवर मिळणार संपूर्ण Disney+hotstar चा खजिना.
भेटी दरम्यान त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी या भागातील युवकांचे प्रश्न आणि समस्या यांची माहिती जाणून घेतली. आपल्यामार्फत त्यांनी युवकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
आगामी काळात आपल्या मार्फत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते आपल्या भेटीदरम्यान म्हणाले.