भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जेष्ठ व सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर केले होते एक विधान. NCP backfires on Darekar’s statement
भाजपाचे जेष्ठ नेते प्रवीण दरेकर हे सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान 16 सप्टेंबरला मुंबईतील आयोजित एका कार्यक्रमात Maharashtrian Folk Dancer लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्या सोबत एकूण 12 कलावंतही राष्ट्रवादीत करणार आहेत. Surekha Punekar to join NCP.
शांताबाई हे गाणं Shantabai Song ज्यांनी गायलं ते गायक संजय लोंढे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यां 12 कलावंतांपैकी एक असणार आहेत.

सुरेखा पुणेकर यांच्यासारख्या सुप्रसिध्द कलावंतांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार म्हटलं की त्यात भाजपाकडून प्रतिक्रिया येणार हे नक्की होतं. तसेही राजकीय पक्ष आमुक एकाच्या पक्षप्रवेशावर किंवा पक्षाला रामराम ठोकल्यावर एकमेकांवर प्रतिक्रिया हे देतातच. त्यात काही नवल नाही.
पण यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपा नेते प्रवीण दरेकरांची मात्र जीभ घसरलेली पहायला मिळाली.
काय म्हणाले दरेकर?
राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिरूर येथे मेळाव्याला दरेकर उपस्थित होते तेव्हा16 तारखेच्या सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांची जीभ घसरलेली पहायला मिळाली. ते त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, गरीब लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला राष्ट्रवादीकडे वेळ नाही, राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे.
हे पण वाचा:
टाकाऊ पासून टिकाऊचा नारा देत साकारला पंतप्रधान मोदींचा पुतळा
Infosys ने जाहीर केले विद्यार्थ्यांसाठी Online course
रितेश आणि जिनीलिया यांनी आणले शाकाहारी मटन
ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती
त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी नेत्यांनी विशेषतः महिला नेत्यांनी त्यांना एकदम खडे बोल सुनावले आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर Rupalitai Chakankar यांनी प्रविण दरेकर Pravin Darekar, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा. असे म्हणत एक अख्खा विडियोच ट्विट केला आहे. Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP, Amol Mitkari and Rupali Chakankar Reply
शिवाय मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीला प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी नेत्या साक्षणा सलगर यांनीदेखील दरेकरांना माफी मागा अन्यथा आपले तोंड काळे केले जाईल असा इशारा देखील दिला आहे.
सध्या महाराष्ट्रात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांवरून एकीकडे भाजप राज्य सरकारला धारेवर धरत आहे आणि एकीकडे त्याच पक्षाच्या नेत्याकडून अशी वक्तव्ये येतात ही बाब विचार करायला भाग पडणारी असून नक्की आपण कशा प्रकारचे राजकारण करतो आहोत हे सर्व पक्षांनी आतमध्ये पाहून स्वतःला विचारले पाहिजे.
सुरेखा पुणेकर यांच्या विषयी थोडक्यात:
सुरेखा पुणेकर यांनी आपल्या वयाच्या आठव्या वर्षी पायांत घुंगरू बांधून आपल्या लावणी Maharashtrian folk dance कारकिर्दीची सुरवात केली होती. कारभारी दमानं, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, या रावजी बसा भावजी अशा त्यांच्या लावण्या खूप लोकप्रिय ठरल्या.
नटरंगी नार हा त्यांचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रभर किंबहुना जागतिक पातळीवर चांगलाच लोकप्रिय ठरला. त्यांनी याशिवाय बऱ्याच लावणी Maharashtrian folk dancer कलावंतिनिना ही कला शिकवली देखील आहे.