Money Heist चा ट्रेलर झाला लॉंच.
Netflix ची सिरिज असलेली Money Heist
ही मूळतः एक स्पॅनिश क्राइम ड्रामा सिरीज असून स्पॅनिश मध्ये तिचं नाव La casa de papel असं आहे.

इंग्रजी मध्ये त्याचा अर्थ The House of Paper असा होतो तर Netflix ने त्याचं नामकरण Money Heist असं केलं आहे व ती Álex Pina यांची कलाकृती आहे.
आता एखादी सिरीज किंवा चित्रपट Netflix ने प्रदर्शित करायची म्हणजे ती हिट होणारच. ऑनलाईन ओटीटी मंचावर त्यांची उगाच मक्तेदारी नाही!
नुकताच Netflix ने Money Heist च्या पाचव्या सीझनचा ट्रेलर Youtube वरती प्रदर्शित केला आहे.
Antena 3 या स्पॅनिश नेटवर्कवर २ मे २०१७ ला पहिल्यांदा ही सिरीज एकूण १५ भागांत प्रदर्शित करण्यात आली होती. Royal Mint of Spain आणि Bank of Spain यांवरती टाकलेल्या अतिशय नियोजनबद्ध दरोडयावर ही सिरीज बेतली असून ह्या सर्व दरोडयांचा मुख्य सूत्रधार डोक्याने अतिशय शांत व कमालीचा हुशार असा एक प्रोफेसर the Professor (Álvaro Morte) असतो.
एकूणच त्याने केलेल्या पद्धतशीर नियोजनामुळे त्याचे सहकारी दरोडयांत कसे यशस्वी होतात याचा अगदी चित्तथरारक प्रवास या सिरीजमध्ये मांडला आहे.
हे पण वाचा:
eRupi: Digital payment क्षेत्रात मोदी सरकारचं मोठं पाऊल.
तुम्ही Ola Scooter बुक केली का?
Pegasus बद्दल तुम्हाला माहीत आहे का?
२०१७ च्या अखेरीस Netflix ने Money Heist चे सर्व हक्क आपल्याकडे घेऊन तिला २२ भागांत विभागून पहिला सीझन व दूसरा सीझन अशी विभागणी करून डिसेंबर १७ व एप्रिल १८ ला प्रदर्शित पण केले.
त्यानंतर Netflix ने आपले बजेट वाढवून आणखी १६ भाग बनविण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यापैकी ८ भाग सीझन ३ रा म्हणून १९ जुलै २०१९ ला व चौथा सीझन ३ एप्रिल २०२० ला प्रदर्शित केला.
सीझन दर सीझन कथानकात वाढत जाणारी उत्सुकता व आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता यामुळे ही सिरीज जगभरात तूफान लोकप्रिय झाली आहे. शिवाय चौथ्या सीझनच्या शेवटाला त्यांनी कथानक अशा वळणावर आणून ठेवले होते की आता पुढे काय याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
Netflix ने आगामी पाचव्या सीझनचा ट्रेलर Youtube वर प्रदर्शित करून आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. शिवाय आता त्यांना त्यासाठी जास्त वाटही पाहायला लागणार नाही. विशेष म्हणजे Netflix पाचवा सीझन दोन व्हॉल्युम मध्ये प्रदर्शित करणार आहे.
त्यापैकी पहिला व्हॉल्युम येत्या ३ सप्टेंबरला प्रदर्शित होईल!
आत्तापर्यंत Money Heist या सिरीजला जगभरातून खूप सारे पुरस्कार मिळाले असून बेस्ट ड्रामा सिरीज हा पुरस्कार ४६ व्या आंतरराष्ट्रीय एम्मी अवार्ड्स मध्ये मिळाला आहे.(Best Drama Series at the 46th International Emmy Awards)
त्यातील बेला चॅव (Bella ciao) हे पूर्ण सिरीजभर अधूनमधून वाजणारं इटालियन अॅंटी फासिस्ट गाणं तर जगभरात लोकप्रिय झालं आहे.
Álvaro Morte सोबतच Úrsula Corberó, Itziar Ituño,Pedro Alonso,Paco Tous,Alba Flores, Miguel Herrán यांनी त्यात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
[…] Money Heist येतोय लवकरच आपल्या भेटीला […]
[…] Money Heist येतोय लवकरच आपल्या भेटीला […]
[…] Money Heist येतोय लवकरच आपल्या भेटीला […]