modi statue from scrap
शेअर करा.

कर्नाटकातील पिता-पुत्रांनी साधली किमया, बनवला तब्बल १४ फुटांचा पुतळा. PM Modi statue from scrap.

scrap material टाकाऊ वस्तूंपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा साकारण्याची किमया साधली आहे ती कर्नाटकातील गुंटूर जिल्ह्यातील तेनाली येथील मूर्ती कलाकार कतुरू वेंकटेश्वरा राव आणि त्यांचा मुलगा कतुरू रवी या पिता- पुत्रांच्या जोडीने.

modi statue from scrap
modi statue from scrap image source:The Hindu

मोदींचा हा टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला पुतळा लवकरच बंगळुरू शहरात बसवण्यात येणार आहे. साधारण दोनेक महिन्यांपासून त्यांचं हा पुतळा बनवण्याचं काम सुरू होतं आणि आत्ता हे काम पूर्ण झालं असून तो पुतळा आता अनावरणासाठी पाठवण्यास पूर्णतः तयार आहे.

कसा बनवला पुतळा?

वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंच्या धातूपासून त्यांनी हा पुतळा बनवला असून त्यात त्यांनी विविध गाड्यांचे भंगारातील अवशेष, धातूच्या चैनी, चाके, लोखंडी बार, साळया, नट-बोल्ट, पत्रे अशांचा वापर त्यांनी त्यासाठी योग्य रीतीने केलं आहे.

पुतळ्याच्या काही अंगांसाठी उदाहरणार्थ केस, चश्मा, भुवया यासाठी त्यांनी GI wires चा ही वापर केला आहे. रवी म्हणाले की हा पुतळा बनवण्यासाठी त्यांना जवळपास १० माणसांची गरज पडली आणि त्यासाठी त्यांचे एकूण अंदाजे ६०० हून अधिक तासांची अहोरात्र मेहनत सुद्धा त्यांना घ्यावी लागली.

रवी यांना पुतळे बनवण्याच्या कारागिरीमध्ये मास्टर ची डिग्री असून याही अगोदर त्यांनी बनवलेले पुतळे बंगळुरू शहरात उबहेही आहेत. त्यांच्या सांगण्यावरून तरी त्यांची ही पाचवी पिढी आहे जी पुतळे आणि त्यासंबंधी कारागिरी मध्ये कामे करतात.

हे पण वाचा:

Infosys ने जाहीर केले विद्यार्थ्यांसाठी Online course

रितेश आणि जिनीलिया यांनी आणले शाकाहारी मटन

Matrix येणार तब्बल 18 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला,The Matrix Resurrections चा ट्रेलर

ते पुढे असेही म्हणाले की अशा भंगारात निघालेल्या धातूपासून सहसा अशा प्रकारच्या मूर्ती बनवल्या जात नाहीत. लोक ब्रॉन्झ धातूंपासून ओतीव काम केलेल्या मूर्ती/ पुतळे वापरणे पसंत करतात आणि हा पुतळा बनवताना आम्हाला बऱ्याच अडचणीचा सामना देखील करावा लागला.

याआधी देखील त्यांनी बनवला होता पुतळा

त्यांनी हा पंतप्रधान मोदींचा जो पुतळा आता बनवला आहे हा काही त्यांचा अशा प्रकारामधील पहिला पुतळा नाही. याच्याही आधी त्यांनी एक पुतळा बनवला होता.

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी Mahatma Gandhi यांचा देखील पुतळा त्यांनी सर्वप्रथम बनवला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांनी तब्बल ७५००० नट आणि बोल्टचा वापर केला होता.

पंतप्रधान मोदींच्या पुतळ्यासाठी त्यांनी लागणारे साहित्य हे कर्नाटक, हैदराबाद आणि चेन्नई भागातूनही मागवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *