एमएमआरडीए (MMRDA) ने दिले नागरिकांना आव्हान. एमएमआरडीए (MMRDA)ला मुंबईच्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला (MUMBAI METRO TRAVEL CARD) नाव द्यायचे आहे.

आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडल वरून एमएमआरडीए (MMRDA) ने एक पत्रक जाहीर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की नव्याने होऊ घातलेल्या मुंबई महा मेट्रो (M3) MUMBAI MAHA METRO च्या प्रवास कार्डला TRAVEL CARD नाव सुचवण्याचे आव्हान एमएमआरडीए करत आहे. THE METRO CARD
घेऊन येत आहोत, तुमच्यासाठी एक अद्वितीय आव्हान. मुंबईच्या नव्याने सादर होणाऱ्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला METRO TRAVEL CARD नाव काय द्यायचे? काही सुचवू शकाल का? एमएमआरडीएला हवे आहे तुमचे मत आणि सल्ला! असे कॅप्शन देत त्यांनी ट्विट केलं आहे.
त्यांनी लोकांना त्यांच्या कल्पना, सूचना आणि प्रवेश खालील ईमेल वरती पाठवण्याचे आवाहनही केले आहे.
travelcard@mailmmrda.maharashtra.gov.in
शिवाय त्यांनी एक मोबाइल क्रमांकही दिला आहे +91 81081 90235. त्यात त्यांनी सांगितलं आहे की वरील माहिती तुम्ही या क्रमांकावरही पाठवू शकता असे म्हटले आहे.
हे सगळं पाठवताना नागरिकांनी त्यांचं पूर्ण नाव, फोन नंबर, आपलं पत्ता आणि ईमेल न चुकता नमूद करणे आवश्यक आहे.
हे पण वाचायला विसरू नका:
महिंद्राच्या ‘थार’ला टक्कर द्यायला येणार ही गाडी
टकाटक दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आहे ‘एक नंबर’
सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच
कधीपर्यंत पाठवता येणार?
एमएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी ज्या काही सूचना, नावे व इतर बाबी नागरिकांना सुचवण्याचे आव्हान दिले आहे त्याची मुदत त्यांनी १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल असे सांगितले असून १५ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिक सर्व नावे व सूचना वरील पत्त्यांवर पाठवू शकतील.

विजेत्याचा सत्कारही केला जाईल:
त्यांनी आणखी खास बाब त्यात नमूद केली आहे आणि ती म्हणजे त्यातून जो एक विजेता निवडला जेल त्याचा योग्य सत्कार केला जेल असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हे आव्हान स्वीकारायला हवं आणि योग्य नाव सुचवून द्यायला हवं.
mmrda full form, mmrda recruitment, mumbai metro map