mirabai chanu wins silver for indi
शेअर करा.

ऑलिंपिकच्या सुरवातीलाच भारतासाठी एक गोड बातमी आली आहे.

भारतातर्फे ऑलिंपिक मध्ये पदकांचं खातं उघडलं गेलं आहे. स्पर्धेच्या अगदी सुरवातीलाच भारताने आपलं स्पर्धेतील पहिलं वाहिलं रौप्य पदक मिळवलं आहे.

Mirabai chanu (picture source: Internet)

भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून भारताला या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये आपलं खातं उघडून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज तिने पदक मिळवून तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे, तसेच १३० कोटी भारतीयांच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मीराबाई चानू हिचे अभिनंदन!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट करत पदक विजेत्या मीराबाई चानू हिचे संपूर्ण भारतातर्फे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय की, याहून चांगली सुरवात ती काय असू शकते.? पुढे ते हे ही नमूद करायला विसरले नाहीत, की तिचं आजचं हे यश संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी असेल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अख्ख्या देशवासीयांकडून चानू वरती शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला आहे! भारताचा माजी सलामीवीर व तडाखेबंद फलंदाज विरेन्द्र सेहवाघनेही आपल्या खास शैलीत भारतीय नारी सब पर भारी असे ट्विट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे मीराबाई चानू?

८ ऑगस्ट १९९४ रोजी नोङ्गपोक काकचिंग, पूर्व इंफाळ, मणीपुर मध्ये जन्मलेली भारताची वेटलिफ्टर असलेल्या मीराबाई चानूने २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सतत भाग घेतला आहे. २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत २ रौप्य पदके मिळवली होती. शिवाय World Championships व Commonwealth Games मध्येही तिला काही पदके मिळाली आहेत.

तिला राजीव गांधी खेळ रत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) या भारत सरकारच्या (Government of India) पुरस्काराने २०१८ साली सन्मानित करण्यात आलं आहे. २०१७ साली अमेरिकेत पार पडलेल्या  World Weightlifting ChampionshipsAnaheim या स्पर्धेत तिने सुवर्ण पदक मिळवलं होतं आणि ती तिची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगिरी होती.!

तिला मिळालेले पुरस्कार.

चानूला माणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याकडून २० लाखांच्या रोख रक्कमेचं बक्षीस मिळालं असून तिला भारत सरकारतर्फे दिल जाणारा राजीव गांधी खेळ रत्न हा क्रीडा प्रकारातील सर्वोच्च पुरस्कारही कतार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्यावर दिला गेला आहे.

आणि आत्ता टोकियो ऑलिंपिकमध्ये तिला रौप्य मिळाले आहे!

हेही वाचा!

चीनची कियान यांग टोकियो ऑलिंपिकची पहिली सुवर्णपदक विजेती!

टोकियो ऑलिम्पिकचं दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन.!

3 thoughts on “टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतानं खातं उघडलं.!”
  1. […] आपल्याला आपल्या भारतीय खेळाडूंकडूनही खूप अपेक्षा आहेत. आपल्याही खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतली असून या तरी ऑलिंपिकला आपल्या पदकांचा दुष्काळ संप… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *