MG Astor भारतातील पहिली पर्सनल असिस्टंट personal assistant एआय एसयूव्ही AI SUV आहे.
एसयूव्ही कारच्या SUV car कॉम्पॅक्ट प्रकारात येणारी उत्तम कार असणार. compact SUV car
मुळची ब्रिटिश असलेली आणि भारतीय बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवू पाहणारी आलिशान गाड्या बनवणारी कंपनी असलेली एमजी अर्थात मॉरिस गराज Morris Garage आपली नवी कार भारतीय बाजारात लवकरच आणणार आहे.

नव्याने आणू घातलेल्या त्या कारचे नाव आहे MG Astor अॅस्टर.
या कारला फर्स्ट-इन-सेगमेंट First in segment ऑटोनॉमस लेव्हल 2 तंत्रज्ञानाची autonomous level 2 technology सुविधा यात देण्यात आली आहे असे एमजी कडून जाहीर केलं आहे.
सध्या बऱ्याच कार उत्पादक कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स artificial intellegence या तंत्रज्ञानावर काम करताना दिसत आहेत. एमजीही यात मागे नाही. त्यांनी देखील या अॅस्टर मिड रेंज एसयूव्ही mid range suv मध्ये एआय या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय असिस्टंट personal assistant मिळालेली अॅस्टर ही पहिलीच कार आहे.
त्याचसोबत त्यांनी आय-स्मार्ट हबची i-smart hub सुविधाही दिली आहे. त्यासाठी त्यांची जिओ सोबत भागीदारीही असल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा:
महिंद्राच्या ‘थार’ला टक्कर द्यायला येणार ही गाडी
सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची पोहचली इंग्लंडला
राज्यातील मंदिरांच्या बाबतील महत्वपूर्ण निर्णय
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व एमडी असलेले राजीव छाबा Rajiv Chaba म्हणाले, “ऑटो-टेक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच यशस्वी तंत्रज्ञान आधी सादर केले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही आम्ही पुढे जात आहोत.

अॅस्टर ही एक पाऊल पुढे असून ग्राहकांना प्रीमियम/लक्झरी सेगमेंटमध्येच मिळणाऱ्या इंडस्ट्री फर्स्ट आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्यांसह एक क्रांती घडवून आणेल. उत्पादनांच्या केंद्रस्थानी असलेल्या नूतनाविष्कार आणि सॉफ्टवेअरच्या अखंड पाठपुराव्यामुळे, आमची वाहने एआयचा लाभ घेत अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देत राहतील.”
मॅप माय इंडियासोबत नकाशे व नेव्हिगेशन, कोईन अर्थद्वारे ब्लॉकचेन blockchain संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट, जिओ कनेक्टिव्हिटीआणि इतर बऱ्याच सुविधा समाविष्ट आहेत.

एमजीच्या चालकांना जिओ सावन jio saavn अॅपवर संगीत ऐकता येईल आणि कारमध्ये पार्क+द्वारे पार्किंग स्लॉट आरक्षित करण्याचे इंडस्ट्रीतील पहिले वैशिष्ट्य देण्यात आले आहे.
एमजी कडून या कार विविध रंगांत उपलब्ध करून देण्यात येतील. उदा स्पाइस्ड ऑरेंज, स्टारी ब्लॅक, ऑरोरा सिल्वर, ग्लेज रेड आणि कॅन्डी व्हाईट या रंगांमध्ये.
सध्या बाजारात असलेल्या ह्युण्दाई क्रेटा, महिंद्रा एक्स्यूवी 700, टाटा नेक्सॉन यांच्याशी तिची स्पर्धा असेल.
अॅस्टरच्या जमेच्या बाजू
तिच्या क्लास मधील मोठी एसयूव्ही असेल
ब्ल्युटुथ की आणि एआय
6 एयर बॅग्स सह वाढीव संरक्षण
दोन्ही इंजिनच्या पर्यायांसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन
अॅस्टरचे कच्चे दुवे
डिझेल इंजिनचा पर्याय नाही
वेंटीलेटेड सिटस आणि पॅडल शिफ्टर कमी केले
किंमत जास्त असण्याची शक्यता
किंमत काय असेल?
1498 cc आणि ऑटोमॅटिक असलेल्या या पेट्रोल कारची अपेक्षित किंमत 10 लाख असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.