दिग्दर्शक मिलिंद कवडे आपल्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी नाविन्यपूर्ण असे आपल्या प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात.
सामाजिक विषयांवर चित्रपट बनवून त्यातून आपल्या खास शैलीत एक जबरदस्त संदेश समाजाला देण्यात जणू त्यांचा हातखंडा आहे म्हणावं लागेल.
२०१९ साली प्रदर्शित झालेला त्यांचा टकाटक हा चित्रपट त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
अडल्ट कॉमेडी सोबत त्यांनी चित्रपटाच्या शेवटाला दिलेला जो संदेश आहे हे समीकरण सहजासहजी जमवायला अवघड असतं पण त्यात ते मिलिंद कवडे यांनी ते लीलया पार पाडले होते.
टकाटक च्या भरघोस यशानंतर आता दिग्दर्शक मिलिंद कवडे आगामी कोणता चित्रपट घेऊन येणार याबद्दल प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती.

लॉकडाऊन नंतर त्यांनी एका चित्रपटाची घोषणा करून त्यांनी त्याच्या चित्रीकरणासही सुरवात केली होती.
तीनेक दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम हॅंडल वरून stay tuned म्हणून आपल्या प्रेक्षकांना चित्रपटाबाबत संकेत दिले होते आणि दुसऱ्याच दिवशी दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले.
आऊट ऑफ दी बॉक्स फिल्म्स च्या सहयोगाने आणि धुमाळ प्रॉडक्शनच्या बॅनरची निर्मिती असलेल्या एक नंबर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे ती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि स्वतः मिलिंद झुंबेर कवडे यांनी.
हे पण वाचा:
jio युजर्सना आता नव्या प्लॅन्सवर मिळणार संपूर्ण Disney+hotstar चा खजिना.
४ तारखेची राज्यसेवा आयोगाची परीक्षा देताय मग या पाच गोष्टी करा
सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच
5 Highly Recommended English Practice Apps तुमचं इंग्लिश सुधरविण्यासाठी
खास बाब म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून धुमाळ प्रोडक्शन हे चित्रपटनिर्मितीकडे वळले आहे.
टकाटक चा टकाटक नायक प्रथमेश परब यालाच कवडे यांनी याही चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले असून त्याच्यासोबत ऋषिकेश धमापूरकर, सुमित भोकसे,मिलिंद शिंदे, निशा परूळेकर, गणेश यादव, अभिलाषा पाटील असे अजून कलाकार या चित्रपटात झळकतील.