मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
शेअर करा.

क्रीडा क्षेत्रात अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूला खेलरत्न पुरस्कार दिला जातो.

आत्तापासून खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी खास एक ट्विट करून ही माहिती संपूर्ण देशाला दिली आहे की, सध्या ऑलिंपिक मध्ये भारताला गर्व करण्यासारखे काही क्षण मिळाले असून जनतेतून एक भावना समोर येत आहे की खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव देण्यात यावं.

source: twitter

कारणही तसे खासच म्हणावे लागेल कारण तब्बल ४१ वर्षांनी भारताला आपल्या राष्ट्रीय खेळात ऑलिंपिकमध्ये एखादं पदक मिळालं आहे. त्याचाच योग साधत पंतप्रधानांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव खेळाच्या या सर्वोच्च पुरस्काराला देण्यात येत आहे असे स्पष्ट केलं आहे.

 Add title

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी खास एक ट्विट करून ही माहिती संपूर्ण देशाला दिली आहे की, सध्या ऑलिंपिक मध्ये भारताला गर्व करण्यासारखे काही क्षण मिळाले असून जनतेतून एक भावना सोर येत आहे की खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव देण्यात यावं.

कारणही तसे खासच म्हणावे लागेल कारण तब्बल ४१ वर्षांनी भारताला आपल्या राष्ट्रीय खेळात ऑलिंपिकमध्ये एखादं पदक मिळालं आहे. त्याचाच योग साधत पंतप्रधानांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव खेळाच्या या सर्वोच्च पुरस्काराला देण्यात येत आहे असे स्पष्ट केलं आहे.

मेजर ध्यानचंद पुरस्कार माहिती

सन १९९०-९१ सालापासून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून देण्यात येऊ लागलेल्या पुरस्काराचे नाव भारताच्या टोकियो ऑलिंपिक मधल्या पदकाच्या यशाने आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे.

मेजर ध्यानचंद माहिती, मेजर ध्यानचंद अवार्ड

२९ ऑगस्ट १९०५ साली अलाहाबाद येथे जन्मलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या गोल करायच्या खास शैलीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार म्हणूनही संबोधण्यात येते. ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असताना त्यांनी ऑलिंपिक मध्ये सलग ३ वेळा सुवर्ण पदके जिंकून दिली होती. सन १९२८, १९३२ आणि सन १९३६ साली आपल्या खेळाच्या जोरावर तेव्हा ही पदके मिळाली होती.

हॉकीच्या खेळात भारताचं तेव्हाच्या घडीला निर्विवाद वर्चस्व होतं.

हे वाचलं का?

सोनालीच्या बिकीनी फोटोने नेटकरी झाले घायाळ

मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा

तुम्ही Ola Scooter बुक केली का?

अवघ्या बाराव्या वर्षी तिने जिंकलं ऑलिंपिक पदक

हा त्यांचाच प्रभाव म्हणावा लागेल की १९२८ ते १९६४ या कालावधीत भारताने आठ ऑलिंपिकपैकी सात विजेतेपदके पटकावली होती.

मेजर ध्यानचंद यांच्या आत्मचरित्रानुसार त्यांनी १९२६ ते १९४९ या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८५ सामन्यांत एकूण ५७० गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांचे पुत्र असलेले अशोक कुमार यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून त्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत.

3 thoughts on “खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *