बोलेरो ही ग्रामीण भारतातील जास्त खपाच्या गाड्यांपैकी एक गाडी आहे.
साधारणपणे महिंद्रा ने बोलेरोचं पहिलं मॉडेल सन २००० आली बाजारात आणलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यात काहीसे बदल करत काळानुसार नवनवीन मॉडेल्स त्यांनी बाजारात आणलीही.
सुरवातीच्या काळात प्रगतशील शेतकरी आणि नेतेमंडळी यांच्यात बोलेरोची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली.
नंतर महिंद्रा ने स्कॉर्पिओ चे मॉडेल बाजारात आणले त्याला तर खूपच ताबडतोड प्रतिसाद मिळाला; पण बोलेरो आपलं अस्तित्व टिकवून राहिली.
पोलिस दलात झालेला बोलेरोचा समावेशच तिची क्रेझ सांगण्यास पुरेसा आहे.
नुकतंच महिंद्रा कडून बोलेरोचं नवीन मॉडेल बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी त्या मॉडेलला बोलेरो निओ (mahindra bolero neo) हे नाव दिलं आहे.
बोलेरो निओ ची किंमत साधारणपणे ८.४८/-* लाखांपासून सुरू होईल असं महिंद्रा कडून सांगण्यात आलं आहे.
जाणून घेऊयात महिंदा निओची फीचर्स
ही गाडी डायमंड व्हाईट, रॉकी बेज, मॅजेस्टिक सिल्व्हर, नपोली ब्लॅक आणि हाइवे रेड या पाच रंगात उपलब्ध होईल.

ही गाडी मॅन्यूअल ट्रान्समिशन असून ती डिझेल इंजिन असेल.


त्यासोबत स्पोर्टी हेडलॅम्प, ताकदवर HVAC, मायक्रो हायब्रीड, इको मोड, टील्ट स्टिअरिंग, इटालियन इंटेरियर, तीसरी जनरेशन चासिस, ABS,EBD,CBS सिस्टीम व सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्या दोन एअर बॅग्स.


महिंद्राच्या बोलेरो बरोबरच महिंद्राचे XUV700 हेही मॉडेल लवकरच बाजारात येत आहे. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला आनंद महिंद्रा यांनी XUV700 हे मॉडेल बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे पण वाचा:
Money Heist येतोय लवकरच आपल्या भेटीला
नेटकऱ्याने विचारले नीरजला ही गाडी देणार का? आनंद महिंद्रा म्हणाले..
खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
गोल्डमॅन नीरज चोप्रा, टोकियो ऑलिंपिक मध्ये भारताला पहिलं सुवर्ण
१५ जुलै ला अनावरण केलेल्या महिंद्रा बोलेरो ही थोडीबहुत दिसायला TUV 300 सारखी वाटत जरी असली तरी ती ग्राहकांच्या पसंतीस उतरते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल.
पण एकंदरीत बोलेरो हे मॉडेल चांगलंच यशस्वी ठरलेलं होतं तर त्याच्या बोलेरो निओ कडूनही तशीच अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरणार नाही असं समजायला हरकत नाही.
[…] […]