Mahadev Jankar
शेअर करा.

आटपाडी Atpadi taluka तालुक्यातील शेटफळे Shetfaleगावी माजी मंत्री राहिलेले महादेव जानकर Mahadev jankar हे आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जेवण्यास आले होते.

तिथे गावातील एका शेतकऱ्याने आपली व्यथा रडतच त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी थेट त्या शेतकऱ्याच्या बांधावरूनच महाराष्ट्राचे कृषि मंत्री मा. दादासाहेब भुसे Dadasaheb Bhuse यांनाच फोन लावला.

नेमकं काय घडलं?

त्याचं असं झालं की महादेव जानकर Mahadev jankar हे आटपाडी तालुक्यातील Atpadi Taluka शेटफळे Shetfale या गावी आपला कार्यकर्ता ब्रम्हदेव गायकवाड यांच्या घरी जेवण्यास म्हणून आले होते.

Mahadev Jankar
Mahadev Jankar, Image credits:facebook

तिथे ब्रम्हदेव गायकवाड यांचे नात्याने चुलते असेलेले श्री. चंद्रकांत विनायक गायकवाड हे देखील आले होते. बोलण्या बोलण्यातून विषय निघाले असता चंद्रकांत गायकवाड यांनी आपली व्यथा मा. जानकरांपूढे मांडली. आपली व्यथा मांडताना त्यांच्या डोळ्यांत अश्रु उभे राहिले.

त्यांची ती पीडा पाहून जानकरांनी थेट त्यांच्या रानतच धाव घेतली आणि त्यांच्या डाळिंब पिकाची पाहणी करून त्यांनी तिथूनच सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री असलेले मा. दादासाहेब भुसे Dadasaheb bhuse यांना थेट फोन लावला आणि त्यांनी त्या शेतकऱ्याची व्यथा त्यांच्या समोर मांडली.

काय म्हणाले जानकर?

जानकर म्हणाले की, कृषि मंत्री दादासाहेब भुसे हे आपले खूप चांगले स्नेही आहेत आणि ते आपले काम नक्की करतील. फोनवर ते त्यांच्याशी बोलताना म्हणाले की, या शेतकऱ्याची २५ एकर डाळिंबाची बाग ही मर या रोगाने अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. त्याला त्यावर कोणतीही शासकीय सवलत वा अनुदान मिळाले नसून हा शेतकरी हा ओपन कॅटेगरी मधील असून बाकीच्याही काही योजनांचा त्याला लाभ मिळत नाही. तर आपण त्या संबंधित जिल्हा कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांपैकी कुणाला तरी मदतीसाठी पाहणी करण्यास सांगण्याचे त्यांनी सुचवले.

Mahadev Jankar makes a call to Minister Of Agricultural

हे पण वाचा:

आणि #bycottshahrukhkhan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला

ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती

सकाळी लवकर उठायचंय मग या पाच गोष्टी कराच

5 Highly Recommended English Practice Apps तुमचं इंग्लिश सुधरविण्यासाठी

कृषिमंत्री काय म्हणाले?

कृषिमंत्र्यांनी जानकरांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी त्या शेतकऱ्याचे नाव, पत्ता आणि फोन नंबर घेऊन दोन तासांतच आटपाडी तालुक्याचे कृषि अधिकारी येऊन संबंधित शेतीचे किंवा डाळिंब बागेची पाहणी करून जातील व पुढील मदत मिळवून देण्यात मदत करतील असे आश्वासन दिले.

आपण शेतकऱ्यांची पोरं असल्यामुळे आपल्याला त्यांच्या व्यथा माहीत आहेत आणि आपण त्यांना न्याय मिळवून द्यायलाच इथे आहोत असे जानकर म्हणाले.

त्यांचे आदेश येताच सगळी यंत्रणा कमला लागल्याचे दिसून येत आहे.

जानकरांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

महाराष्ट्र राज्याचे Maharashtra State माजी पशू संवर्धन, मस्य संवर्धन व दुग्ध विकास मंत्री राहिलेले आहेत. २००३ साली त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आणि त्यांनंतर त्यांनी महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली कारकीर्द घडवली.

जानकर हे सांगलीच्या वालचंद कॉलेजचे Walchand college Sangli माजी विद्यार्थी असून त्यांनी तिथून विद्युत अभियांत्रिकीची पदवी BE in Electrical Engineering प्राप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *