लियोनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडतोय असं क्लब च्या वतीने सांगण्यात आलं आहे. Lionel Messi leaves FC Barcelona
मेस्सी लवकरच फ्री एजंट म्हणून नवीन क्लबशी जोडला जाईल.
अर्जेंटीनाचा कर्णधार आणि फुटबॉलच्या इतिहासातील एक महान खेळाडू असलेल्या लियोनेल मेस्सीने नुकताच त्याचा फुटबॉल क्लब बार्सिलोनाला अलविदा केला आहे.
ला लिगा सीजनच्या अगदी तोंडावर त्याने आपल्या क्लबला रामराम ठोकला असून आता तो एक फ्री एजंट म्हणून दूसरा एखादा क्लब जॉइन करेल असं सांगण्यात आलं आहे.

३४ वर्षीय लियोनेल मेस्सीचा बार्सिलोना क्लबशी असलेला करार या वर्षी १ जूनलाच संपुष्टात आला आहे. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तो त्या क्लबला रुजू झाला होता आणि आत्तापर्यंत म्हणजे जवळपास २१ वर्षे तो बार्सिलोना क्लबच्या सोबत राहिला.
बीबीसी स्पोर्ट्स च्या म्हणण्यानुसार क्लब आणि मेस्सी दोन्ही पक्ष आज नवीन करार करणे अपेक्षित होतं पण ऐनवेळी गोष्टी जुळून नाही आल्या. दोन्ही पक्षांना शल्य आहे की खेळाडू आणि क्लब यांच्या इच्छा एकावेळीच पूर्ण करणं शक्य नाही झालं असं क्लबच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
पुढे त्यांनी हे म्हटलं आहे की आम्हाला आमच्या आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे हा करार पूर्णत्वास नेता आला नाही. याचा परिणाम म्हणून मेस्सीला हा क्लब सोडावा लागतो आहे.
आणखी वाचा:
अवघ्या बाराव्या वर्षी तिने जिंकलं ऑलिंपिक पदक
सोनालीच्या बिकीनी फोटोने नेटकरी झाले घायाळ
तुम्ही Ola Scooter बुक केली का?
Pegasus बद्दल तुम्हाला माहीत आहे का?
मेस्सीने बार्सिलोना कडून खेळताना,
६७२ गोल, १० ला लिगा (La Liga) विजेतेपद, ४ चॅम्पियन लीग, ७ Copa del Rey तसेच the Ballon d’Or तब्बल सहा वेळा जिंकली आहे.
२५ ऑगस्ट २०२० साली एका फॅक्स द्वारे त्याने क्लबला आपला करार तोडण्याबाबत विचारणा केली होती आणि त्याला तत्काळ करारातून मुक्त करण्याबाबतही विचारणा केली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२० ला त्याने आपण बार्सिलोनासोबतच राहू असं त्यानं स्पष्ट केलं कारण दूसरा कोणता क्लब त्याला करार तोडण्यासाठी ७०० मिलियन युरो द्यायला तयार नव्हता.
बार्सिलोना क्लब ने मेस्सीला निरोप म्हणून आपल्या ट्वीटर हॅंडल वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मधल्या काळात मग बरीच उलथापालथ झाली देखील अखेर शेवटी १५ जुलै २०२१ ला त्याने बार्सिलोनासोबत कमी वेतनावर २०२६ पर्यंत राहण्याचे कबूल केले; पण काल शेवटी बार्सिलोनानेच जाहीर केलं की आमच्या आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे मेस्सीला हा क्लब सोडावा लागत आहे.
[…] मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा […]
[…] मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा […]
[…] मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा […]
[…] मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा […]
[…] मेस्सीचा बार्सिलोनाला अलविदा […]