The story or an article written on the woman in the picture
शेअर करा.

Kadambini Ganguly Google doodle

Kadambini Ganguly(कादंबिनी गांगुली)कोण होत्या?

जर तुम्हाला आनंदीबाई जोशी माहीत असतील तर तुम्हाला कादंबिनी गांगुली(Kadambini Ganguly)बद्दल थोडंसं जाणून घेतलं पाहिजे.

Image source :internet

रविवारी म्हणजेच १८ जुलैला google ने त्यांच्या सन्मानार्थ doodle बनवले होते.

आता आपण कादंबिनी गांगुली(Kadambini Ganguly) नेमक्या कोण होत्या ते पाहू.

१८ जुलै १८६१ साली ब्रिटिश भारतातील भागलपुर,बिहार(आत्ता बांग्लादेश) येथे जन्मलेल्या कादंबिनी गांगुली भारताच्या पहिल्या पदवीधर महिला व फिजीशियन (चिकित्सा) होत्या.

सन १८८३ मध्ये त्यांनी इतिहास या विषयातून पदवी प्राप्त केली तर सन १८८४ साली त्या कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. सन १८८६ साली तिथून त्यांनी फिजीशियन पदवी प्राप्त केली.

जेव्हा भारतात स्त्रीशिक्षणास कसलीच परवानगी नव्हती तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितही आपले शिक्षण पूर्ण केले होते. शिवाय त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला होत्या ज्यांनी युरोपियन मेडिसीन मध्ये प्रवेश घेतला होता. आपण आनंदीबाईंना पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखतो, त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण अमेरिकेमधून पूर्ण केलं होतं.

Image source: internet (wikipedia)

कॉँग्रेसच्या मद्रासला भरलेल्या १८८९ सालच्या अधिवेशनात कादंबिनी गांगुली यांनी भाग घेतला होता. नुसता भाग घेतला नव्हता तर त्यांनी त्यात भाषणही दिले होते. संस्थेच्या आजवरच्या इतिहासात भाषण देणाऱ्या पहिल्या महिला पण त्याच होत्या!

सामाजिक क्षेत्रात त्यांनी काही उल्लेखनीय कार्ये केली आहेत. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत! त्यांच्या १६० व्या जयंतीचं औचित्य साधून त्यांना सन्मान देण्यासाठी google ने १८ जुलैच्या दिवशी त्यांचं doodle बनवलं होतं!

भारताच्या इतिहासात काही स्त्रियांना खूप मानाचं स्थान प्राप्त झालं आहे आणि ते स्थान त्यांना सहजासहजी तर मुळीच मिळालेलं नाही.

प्रस्थापित रूढी,परंपरा यांच्या विरोधात जाऊन त्यांनी खूप यातना सोसल्या आहेत तेव्हा कुठे आजच्या समाजाने त्यांची दखल घेतली आहे.

जिजामाता, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी अशी कैक नावे आहेत ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे.

अशा महिलांना मानाचा मुजरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *