जपानी(Japanese) लोकांबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरेच काही मिळेल.
जपानी(Japanese) लोक हे संपूर्ण जगभरात त्यांच्या कष्टाळूपणाबद्दल, शिस्तीबद्दल, समयसूचकतेबद्दल ओळखले जातात.
दुसऱ्या महायुद्धा(World War 2) नंतर त्यांनी घेतलेली जी फिनिक्स(Phoenix) भरारी आहे ही त्यांच्या याच काही गुणांचं फलित आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही.
अगदी थोड्या क्षेत्रफळाचा आणि तुलनेने कमी लोकसंख्येचा हा पूर्वीय देश(Eastern Country) आज आपल्या कमालीच्या दर्जाच्या तंत्रज्ञानाने जागतिक बाजारपेठेत(Global Market) आपलं अस्तित्व अगदी घट्ट पकडून आहे.
जपानी लोकांचं हे सामर्थ्य म्हणावं लागेल की त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या भयंकर आपत्तीला समर्थपणे तोंड देऊन त्यातूनही ते आज खंबीर उभे राहिले आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का, की या जपानी लोकांच्या सामर्थ्याचे प्रतीक(Symbol) काय असेल? तर तो आहे एक फोटो.!
हा फोटो आजही जपानी लोक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात.

वरील छायाचित्र हे दुसऱ्या महायुद्धतलं असून ते अमेरिकन छायाचित्रकार जो ओडोनेल(Joe O’Donnell) याने अमेरिकेने जेव्हा जपानच्या नागासाकी(Nagasaki) या शहरावर बॉम्बहल्ला(Atom Bomb) केला होता तेव्हा टिपले होते.
या छायाचित्रात जो मुलगा दिसत आहे तो साधारणपणे नऊ-दहा वर्षांचा असावा आणि तो आपल्या वर्षभराच्या लहान भावाचे मृत पार्थिव पाठीवर बांधून स्मशानाच्या बाहेर अंत्यविधीसाठी रांगेत उभा आहे.
हे ही वाचा:
येत आहे मराठी भाषेतलं हक्काचं ओटीटी (OTT)
सेहवागचं कोहली बद्दलचं ट्विट होतंय व्हायरल
झोमॅटो वरून नुसतं जेवण ऑर्डर करता की झोमॅटोचे शेअर्स पण घेता?
मराठ्यांच्या अटकेपार झेंड्याच्या म्हणीची कहाणी
जो ओडोनेल ने या चित्राबद्दल अशी माहिती दिली आहे की, आपल्या मृत भावाला पाठीवर बांधून तिथे रांगेत उभ्या असलेल्या त्या मुलाच्या डोळ्यांत अश्रूंचा एक थेंबही नव्हता. आपलं रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ आपल्याच दातांनी इतक्या जोरजोरात दाबत होता की त्याच्या ओठांतून रक्त वाहत होतं.
तिथे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला म्हटले की, दे इकडे, तुझ्या पाठीवरचं ओझं मी घेतो.
यावर तो मुलगा त्याला म्हणाला की, माझ्या पाठीवर असलेले हे कोणतेही ओझे किंवा समान नसून हा माझा भाऊ आहे.!
त्याच्या या शब्दाने तेथील उपस्थितांच्या डोळ्यांत आपसूकच पाणी उमटले.
आणि कदाचित म्हणूनच आजही जपानी लोक जपानमध्ये हे छायाचित्र सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात.