iPhone 13 launching on 14 september
शेअर करा.

अॅपलचे प्रोडक्ट Apple product असलेल्या आयफोन 13 च्या लॉंचची iPhone 13 launch जगभरातील ग्राहकांना एक उत्सुकता लागून राहिलेली होती.

बहुप्रतीक्षित असलेल्या अशा या अॅपलच्या आयफोन 13चं लवकरच लॉंचिंग होणार आहे. Apple iPhone 13 launching soon

येत्या 14 सप्टेंबर ला अॅपल Apple iPhone 13 launch date या फोनचं एका खास कार्यक्रमाद्वारे जगभरामध्ये लॉंचिंग करणार आहे.

iPhone 13 launching on 14 september
iPhone 13 launching on 14 september, Image source:Twitter

या लॉंचिंग कार्यक्रमात अॅपल चार नवीन फोन्सची घोषणा करणार आहे अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये आयफोन 13- iPhone 13, आयफोन 13 मिनी- iPhone 13 mini, आयफोन 13 प्रो- iPhone 13 pro, आयफोन 13 प्रो मॅक्स- iPhone 13 pro max हे चार फोन असतील.  

अॅपल चे फोन वापरणे हे हल्ली श्रीमंतीचं लक्षण म्हणून पाहिलं जातं. त्याच्या महागड्या किंमती मुळे तसा तो अजूनही काही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही.

भारतात कधी येणार? iPhone 13 launch in India

14 तारखेच्या लॉंचनंतर अॅपल पहिल्या टप्प्याच्या प्री ऑर्डर्स 17 सप्टेंबर पासून घेईल. पहिल्या टप्प्यात मात्र भारताचा समावेश  नसणार आहे. त्यात अमेरिका, युके, कॅनडा, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया या देशांत तो उपलब्ध केला जाई.

पहिल्या टप्प्यातील देशांत मात्र आयफोन 13 हा साधारणपणे 24 सप्टेंबर पासून वितरित केला जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि भारत हा दुसऱ्या टप्प्यात असल्याकारणाने मात्र इथे हा नवीन फोन 1 ऑक्टोबर पासून मिळायला सुरवात होईल असा प्राथमिक अंदाज आहे.

हे वाचायला विसरू नका:

शिखर धवन घेणार घटस्फोट

मुंबईच्या नव्याने सादर होणाऱ्या मेट्रो ट्रॅव्हल कार्डला सुचवा नाव

महिंद्राच्या ‘थार’ला टक्कर द्यायला येणार ही गाडी

अॅपल चं फोन लॉंच सायकल iPhone launch cycle पाहिलं तर ते ऑक्टोबर च्या आसपास राहतं. त्यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की जरी भारतात दुसऱ्या टप्प्यात आयफोन मिळणार असले तरी ठरलेल्या तारखेच्या थोड्या उशीराच हे फोन ग्राहकांना मिळतील.

काय असेल किंमत? iPhone 13 price, iPhone 13 price in India

आयफोन च्या मागील फोनच्या किंमती पाहता आयफोन 13 ही काही स्वस्तात मिळणार नाही ही बाब ग्राहकांनी आपल्या गाठीशी बांधायला हवी. 64 जीबी आयफोनची भारतीय बाजारात 79,900/- रुपयांनी सुरवात झालेली तर आयफोन 12 प्रो मॅक्सची किंमत 1,29,900/- ला मिळत होता.

त्याचनुसार ग्राहकांनी नव्या आयफोनच्या किंमतीचा अंदाज बांधायला हवा.

काय असतील फीचर्स? iPhone 13 features

अॅपल ने आपल्या प्रोडक्ट बाबत कायमच गुप्तता ठेवली आहे आणि हा आयफोन 13 ही याला काही अपवाद नसणार आहे.  

नव्या फोन ची फीचर्स 14 तारखेला समजतील. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागणार आहे.

2 thoughts on “iPhone 13 लवकरच होणार लॉंच.”
  1. कॉलेजला असताना आय फोन टेन ची स्वप्न बघितलेली……..😁

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *