Infosys ने Infosys Reskilling असं जाहीर केलेल्या कोर्सचं नाव ठेवलं आहे.
यामार्फत कंपनीकडून विद्यार्थ्यांना Online Education ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना कौशल्य पूर्ण शिक्षण Skillful Education मिळणं तितकंच महत्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर आपल्याला त्या त्या क्षेत्रातील काही कौशल्ये आत्मसात करावीच लागतात नाहीतर कुणी दूसरा कौशल्ये असलेला येऊन आपली जागा घेऊन जातो.

देशातील अग्रगण्य आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीने India’s leading IT company Infosys यावर काही तरी करण्यासाठी आणि त्याचसोबत आपला डिजिटल क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी काही नवीन पाऊले उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्सच्या Online Courses माध्यमातून कौशल्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी Infosys Reskilling हा कोर्स आणला असून ते त्यामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध ककरून देणार आहेत.
हे पण वाचा:
रितेश आणि जिनीलिया यांनी आणले शाकाहारी मटन
Matrix येणार तब्बल 18 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला,The Matrix Resurrections चा ट्रेलर
ITR च्या बाबतीत महत्वाची माहिती
१० दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांचे २०२५ पर्यंत इन्फोसिस या उपक्रमांतर्गत कौशल्य वाढवण्याची योजना आखत आहे. त्याचबरोबर इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड Infosys Springboard च्या अंतर्गत इयत्ता सहावी पासून पुढे लाईफटाईम शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांच्या औपचारिक शिक्षणासोबत कार्पोरेट आणि उत्कृष्ट तसेच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची योजना आहे.
संबंधित अभ्यासक्रम हा National Education Policy 2020 भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी साधर्म्यपूर्ण असून त्यात व्यावसायिक कौशल्य विकास समाविष्ट असेल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी सराव, प्रोग्रामिंग, काही मास्टरक्लास उपलब्ध असणार आहेत.
मात्र त्यासाठी व्हर्च्युअल प्रॉक्टर्ड परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.