अहिल्यादेवींच्या पराक्रमी बाण्याचे दर्शन घडावे म्हणून आहेत आग्रही.
विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या संघर्षातून मिळेल प्रेरणा.
आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी आज राजभवनात राज्याचे Govarnor Of maharashtra राज्यपाल मा.भगतसिंग कोशारी Bhagat Singh koshiyari यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनात त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा शस्त्रधारी अश्वारूढ पुतळाच बसविण्यात यावा असा आग्रह धरला. Solapur university , Ahilyadevi holkar
मुंबई येथे त्यांनी प्रत्यक्ष राज्यपालांना भेटून तशा आशयाचे निवेदन दिले.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, शील आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीं यांनी आपल्या कर्तृत्वाने हिंदू संस्कृतीचा स्वाभिमान पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनी आपल्या एक हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन लोककल्याणकारी राज्य उभे केले. त्यांच्यातून सध्याच्या युवक-युवतींना प्रेरणा मिळावी या हेतूने विद्यापीठात त्यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा यासाठीचा ठराव स्मारक समितीने मंजूर केला होता. परंतु नव्याने स्थापित झालेल्या स्मारक समितीने आधीच्या ठरवास नकार देत लोकभावनेचा अनादर केला आहे.
त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा म्हणून त्यांचा पूर्णाकृती पुतळाच व्हावा असे ते म्हणाले आहेत. राजकीय हेतूने असे केले जात असून आपण विद्यापीठाचे कुलपती म्हणून प्रशासनाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शस्त्रधारी अश्वारूढच पुतळा Statue बसविण्याचे आदेश द्यावेत असा त्यात आग्रह धरला आहे.
हे पण वाचा:
शेतकऱ्याच्या बांधावरून जेव्हा महादेव जानकर थेट कृषि मंत्र्यांना फोन लावतात
शासनाचा आदेश झुगारून आमदार गोपीचंद पडळकर करणार छकडा गाडी शर्यतींचं आयोजन
दरेकरांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून खरपूस समाचार
टाकाऊ पासून टिकाऊचा नारा देत साकारला पंतप्रधान मोदींचा पुतळा
राज्यपाल महोदयांनी यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊ केले आहे. त्यावेळी आ. गोपीचंद पडळकर यांच्यासोबत भूषणसिंह राजे होळकर, माऊली हळणवर सुभाष मस्के हे देखील उपस्थित होते.

हल्ली पडळकर हे शेतकरी जनतेचे मुद्दे उचलताना दिसत आहेत. आटपाडी सारख्या भागातून येऊन त्यांनी संबंध महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केली आहे.
ऑगस्ट महिन्यात त्यांनी न्यायालयाचे आदेश झुगारून बैलगाडी शर्यत आपल्या झरे या गावी आयोजित केली होती.
आणि कालच म्हणजे २१ सप्टेंबरला त्यांनी झरे येथे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. त्यात त्यांनी त्यांच्या थकलेल्या वेतनाबाबत जाणून घेऊन पुढील लढाईचे मनसुबे जाहीर केले आहेत.