ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा दूसरा भारतीय ठरला नीरज चोप्रा
तब्बल ८७.५८ मीटर भाला फेकून नीरज चोप्राचा सुवर्णवेध

ऑलिंपिकमध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थाने भारतीयांच्या साठी खूप आनंदाचा ठरला. तिकडे बजरंग पुनियाने फ्री स्टाईल कुस्तीत कास्य पदक पटकावले तर भालाफेक मध्ये नीरज चोप्रा ने तब्बल ८७.५८ मीटर भाला फेकत आपला सुवर्णवेध अचूक टिपला.
नीरजच्या या सुवर्णवेधाने भारताची या स्पर्धेत एकूण पदके ७ झाली असून टोकियो ऑलिंपिक मध्ये एकमेव सुवर्णही भारताच्या पारड्यात पडले आहे.
भारतातर्फे वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवणारा नीरज मात्र दुसराच भारतीय ठरला आहे. भारताला अजून बराच टप्पा गाठायचा आहे; पण हे सुवर्ण त्या टप्प्यासाठी अनेक खेळाडूंची प्रेरणा बनेल हे मात्र नक्की.
भारतातर्फे वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तुम्हाला माहिती आहे का?
२००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारतातर्फे पहिलं वहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलं होतं. आज १२ वर्षांनंतर तशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा दुसराच भारतीय ठरला आहे.
सचिन तेंडुलकर ने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोल्डमॅन नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही नीरज चोप्राची भालाफेक लाईव पाहत असतानाचा विडिओ ट्विट केला आहे.
हे वाचलं का?
खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
गावसकरांनी केली सौरव गांगुलीची तक्रार
eRupi: Digital payment क्षेत्रात मोदी सरकारचं मोठं पाऊल.
एकंदरीत टोकियो ऑलिम्पिकची सुरवात मीराबाई चानूच्या रुपेरी पदकाने झाली होती आणि शेवट मात्र गोल्डमॅन नीरजच्या सोनेरी पदकाने झाला.
तसंही भारत आणि खेळ हे समीकरण काहीसं क्रिकेट भोवती फिरत राहिलं आहे. इतर खेळात क्रिकेटसारखा पैसा नसतो आणि त्यासारखी प्रसिद्धीही नसते त्यामुळे बाकीचे क्रीडा प्रकार काहीसे दुर्लक्षित झाल्यासारखे आहेत; पण आत्ताची तरुण पिढी बऱ्यापैकी क्रिकेटच्या पलीकडे जाऊन विचार करू लागली आहे.
आत्तापर्यंतच्या ऑलिंपिक मधली सर्वांत जास्त पदकांची कमाई भारताने या ऑलिंपिक मध्ये केलीय. ही बाब सकारात्मक आहे आणि इथून पुढे आपले खेळाडू अगदी नेटाने कामगिरी बाजवतील असा विश्वास बाळगायला काही हरकत नाही.
[…] […]
[…] […]