Gavaskar feels Virat Kohli should call up Sachin Tendulkar to address his batting worries like he did in 2014 after a forgettable England tour.
शेअर करा.

INDVSENG, test cricket, Virat Kohli, Sachin Tendulkar, Sunil Gavaskar

काल तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि भारताचा डाव अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.

भारताचा पहिला डाव ४०.४ षटकांत अवघ्या ७८ धावांत आटोपला आणि आत्तापर्यंत नणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतानाचा हा भारताचा सर्वात कमी स्कोअर ठरला.

कोहलीचं अपयश कायम:

आपले प्रतिस्पर्धी फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरत असताना मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली सतत अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोव्हेंबेर २०१९ पासून आजतागायत कोहलीला एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकता आलेलं नाही. सध्या तो खराब फॉर्ममध्ये असून त्याच्याकडून समाधानकारक धावा निघत नसल्यामुळे चाहतेही त्याच्यावर नाराज होऊ लागले आहेत.

हेडिग्ले येथे सुरू असलेल्या कसोटीत कोहलीने १७ चेंडूत एका चौकारासह अवघ्या सात धावा केल्या आणि अँडरसनच्या एका चेंडूवर तो कव्हर ड्राईव खेळताना यष्टीरक्षक बटलरकडे झेल देऊन परतला.

हे पण वाचा:

5 Highly Recommended English Practice Apps तुमचं इंग्लिश सुधरविण्यासाठी

Spider-Man No Way Home चा ट्रेलर आला; पण..

आणि तो फोटो आजही जपानी लोक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात

Gavaskar feels Virat Kohli should call up Sachin Tendulkar to address his batting worries like he did in 2014 after a forgettable England tour.
Gavaskar feels Virat Kohli should call up Sachin Tendulkar to address his batting worries like he did in 2014 after a forgettable England tour. image: cricket of cricket twitter

गावसकरांचा सल्ला काय आहे?

भारताचे महान फलंदाज आणि माजी क्रिकेटपट्टू सुनील गावसकरांनी प्रसारण वाहिनीशी बोलताना कोहलीला उद्देशून म्हणाले की विराटने सचिन तेंडुलकरला फोन करून विचारायला हवे की त्याने यातून बाहेर येण्यासाठी काय करायला हवे. सचिनने सिडनी कसोटीत जे केले तेच आता विराटने करायला हवे. त्याने स्वतःलाच सांगायला हवे की त्याला कव्हर ड्राईव खेळायला आवर घालायचा आहे.

सचिनने काय केले होते?

सचिन २००३ च्या विश्वचषकानंतर २००४ मध्ये सतत अपयशी ठरत होता.

त्यात ऑस्ट्रेलिया मध्ये ४ कसोटी मालिकेत तोही धावा काढण्यात असमर्थ होता, मात्र शेवटच्या कसोटीत त्याने ४३६ चेंडूचा सामना करत तब्बल २४१ धावा केल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या त्याने एकही कव्हर ड्राईव न खेळता काढल्या होत्या.

गावसकरांना कोहलीला हेच सांगायचे असेल की फटके निवडताना होणाऱ्या चुका दुरुस्त करून त्याने आपल्यात सुधारणा करावी जशी सचिनने केली होती. त्यासाठीच त्यांनी त्याला सचिनचा सल्ला घेण्यास सांगितले असावे.

कोहलीच्या गुणवत्तेबाबत कुणालाच शंका नाही पण त्याचा खराब फॉर्म लवकरात लवकर संपून याच्या बॅटमधून धावा बरसाव्यात हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना इंग्लंडच्या ८७.५ षटकांत २ बाद २७४ अशी धावसंख्या होती आणि त्यांनी १९६ धावांची आघाडी घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *